माळी समाज पळसगांव येथे क्रांती ज्योती सावित्रीआई फुले जयंती साजरी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

    अनंत अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला विनम्रपणे माल्यार्पण करण्यात आले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष माळी समाज पळसगांव अध्यक्ष मारोती शेंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव दिनकर शेंडे,ग्रामपंचायत पळसगांवच्या सरपंच्या सरीता गुरनुले,ग्रामपंचायत पळसगांवचे उपसरपंच तुळसिदास शेरकुरे,माजी पंचायत समिती सदस्या वर्षा लोणारकर,पळसगाव पोलीस पाटील रागिना दडमल,ग्रामपंचायत माजी सरपंच गिता शेंडे,भोई समाज मच्छीमार समिती अध्यक्ष होमराज आत्राम,भाजपा कार्यकर्ता राजू आत्राम हे प्रामुख्याने आवर्जून उपस्थित होते.

                  सर्व मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवन पटलावर विशेष प्रकाश टाकलाय आणि समाजमन विचारमय केले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर वाटगूरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश शेंडे यांनी केले.तद्वतच मंगेश शेंडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.