नंदलाल पाटील कापगते विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत 

साकोली :- नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे भारतातील प्रत्येक लेकीला विद्येचे दान देणारी आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.

          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापिका रसिका बि.कापगते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापिका स्वाती गहाणे, प्रा. के.जी. लोथे, डी.एस.बोरकर, के.एम. कापगते, एम.एम.कापगते व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

       सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापिका यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. 

           विद्यालयाचे मुख्याध्यापिका रसिका बी कापगते विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्याने भारतातील शिक्षण आणि महिलांच्या इतिहासावर अमिट छाप सोडले आहे. जेव्हा मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती तेव्हा फुले दाम्पत्यांनी प्रचंड त्रास सहन करून पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली, यावेळी शिक्षण विरोधी समाजकंटक सावित्रीबाई शाळेत जात असता त्यांच्या अंगावर शेण टाकायचे, दगड मारायचे तरीही त्या तसूभरही मागे हटल्या नाही.

        सावित्रीबाई यांनी महिलांच्या शिक्षणासाठी उचललेल्या पावलामुळे आज देशात अनेक शाळांच्या माध्यमातून स्त्रिया शिक्षण घेऊन देश-विदेशात उच्च पदावर व विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.तसेच सावित्रीबाई यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. विधवांचे दुःख कमी करण्यासाठी त्यांनी सतत आवाज उठविला.

          महिला विधवा झाल्यास सतीचे मुंडन करण्याची प्रथा होती, ती प्रथा बंद करून सत्यशोधक समाजाची स्थापना करून महिलांच्या उन्नतीसाठी घराचा उंबरठा झिजवीला म्हणूनच आज स्त्रियांना सन्मानाने जीवन जगता येतो ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले मुळेच… असे मौलिक विचार मुख्याध्यापिका रसिका बी कापगते आणि व्यक्त केले.

              याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक डी.एस.बोरकर सर, के. एम. कापगते, एम. एम. कापगते यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.  

             कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, गीत व मनमोहक नृत्य सादर केले.

             कार्यक्रमाचे संचालन आर.व्ही.दिघोरे सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. स्वाती गहाणे मॅडम यांनी केले. 

               कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.