स्वामी विवेकानंद आश्रम शाळा पळसगांव येथे क्रांती ज्योती सावित्रीआई फुले जयंती (बालिका दिन) साजरी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

   चिमूर तालुकातंर्गत मौजा पळसगाव येथील स्वामी विवेकानंद अनु.आदि.आश्रमशाळा येथे क्रांती ज्योती सावित्रीआई फुले यांची जयंती’ साजरी करण्यात आली.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुष्पा बन होत्या तर माध्यमिक मुख्याध्यापक बोरकर सर,हटवार सर,प्राथ मुख्याध्यापक गेडाम मॅडम,आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी क्रांती ज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.

         यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून सावित्रीआई फुले यांचा जीवनावर प्रकाश टाकला व जयंतीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

      यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे व अध्यक्षा यांनी सावित्रीआई फुले जयंती व बालीका दिन निमित्त आपले विचार मांडले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

     कार्यक्रमाचे संचालन समीक्षा उईके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंचव्टे सर यांनी केले.यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.