क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त मौजा पळसगाव येथील माळी समाजा तर्फे भव्य रॅली..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        आज महाराष्ट्र राज्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याच प्रमाणे चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पिपर्डा) येथील माळी समाज बांधवातर्फे शिक्षणाच्या जनक व समस्त स्त्रीयांच्या उध्दारकर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या सन्मानार्थ मोठ्या उत्साहात गावातून रॅली काढण्यात आली.

               याप्रसंगी पळसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सरीता गुरनुले,पळसगाव व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुमदेव बोरकर,पाणलोट समिती पळसगावचे माजी अध्यक्ष प्रभाकर गजभिये,माजी सरपंच गिताताई शेंडे यांनी जयंती उत्साहात आवर्जून सहभाग घेतला.

             राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्साहातंर्गत रॅलीत मौजा पळसगाव येथील आया बहिणींनी आणि युवक बुजरुगांनी,मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

             पोलिस संरक्षणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्साहाला प्रारंभ झाला असून मौजा पळसगाव येथे प्रसंन्न वातावरण आहे.