अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा पळसगांव द्वारे क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंतीचा थाटात प्रारंभ…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

       शैक्षणिक क्रांतीच्या प्रेरणास्रोत,समस्त स्त्रीयांच्या आधारस्तंभ तथा उध्दारक राष्ट्रमाता-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त उत्सव दिनाला चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पिपर्डा) येथे थाटात प्रारंभ झाला.

          याप्रसंगी पळसगाव पोलिस पाटील रागीनी दडमल,पळसागाव ग्रामपंचायत उपसरपंच तुळशिदास सेरकुरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्साहात सहभागी झाले होते.

           चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पिपर्डा) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्साहात गावातील महिला भगिनीं व पुरुष बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

          क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम रॅलीचे माध्यमातून केले जाते‌.यामुळे मौजा पळसगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा उजाळा करण्यासाठी प्रचंड रॅली गावातून काढण्यात आली.