रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर –
मानधन वाढ पेंशन नविन मोबाईल रिचार्ज रक्कम वाढविने सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात यावी व बचत गट आहाराची व समृद्धी आहाराची रक्कम वाढविण्यात यावी. इतर मागन्यासाठी बुधवारला दुपारी शेतकरी भवन येथुन अंगणवाडी ताईचा मोर्चा थेट चिमूर पंचायत समिती एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर धडकला या मोर्चा चे नेतृत्व महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी सभाचे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांनी केले.
गेली ४८ वर्षे कशाची ही तमा न बाळगता अविरत सेवा देनाऱ्या सरकारच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेनाऱ्या अंगणवाडी ताई महागाईने भरडल्या आहेत ताईकडे कोनी लक्ष दयायला तयार नाहीत त्यामुळे निराश अंगणवाडी ताई कर्मचारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात विवीध मागन्यासाठी मोर्चा एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर काढला मोर्चा चे रूपांतर सभेत झाले.
अंगणवाडी कर्मचारी सभाचे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी, माधुरी रमेश विर चिमुर सितारा शेख ललीता सोनुले संयोगीता गेडाम शोभा मेश्राम सिंदेवाही पुष्पा ठावरी वरोरा मिनाक्शी गायकवाढ यांनी आंदोलना विषयी मनोगत व्यक्त केले. एकात्मीक बाल विकास प्रकल्पच्या प्रकल्प अधिकारी कु.पुनम गेडाम यांनी निवेदण स्विकारले.
त्यानंतर तहसीलदार राजमाने यांना अंगणवाडी शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनाची प्रत चिमूर एकात्मीक बाल विकास प्रकल्प मार्फत महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास आयुक्त मुंबई, व तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवीन्यात आली.
या मोर्चात सात तालुक्यातील हजारो अगंणवाडी ताई कर्मचारी व बचत गट प्रतिनिधी यांनी सहभाग दर्शवीला होता.