भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण तर्फे होणार प.स.सदस्य तथा समाजसेवक अनील किरणापूरे यांचा पुरस्काराने गौरव.. — विविध क्षेत्रातील इतर मान्यवरांचाही समावेश..

 संजय टेंभुर्णे

कार्यकारी संपादक 

भंडारा:-

     २०२४ राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार जाहीर झाले असून भंडारा जिल्हातंर्गत साकोली तालुक्यातील मौजा लवारी(उमरी) येथील रहिवासी असलेले प.स.सदस्य तथा समाजसेवक अनील किरणापूरे पुरस्काराचे मानकरी ठरले असून त्यांचा गौरव १४ जानेवारीला उमरखेड येथे आयोजित केलेल्या गौरव पुरस्कार शोहळ्यात होणार आहे.

          याचबरोबर रेशीमकन्या प्रियंका फाटे-बीड,कृषीकन्या सुशिला बिडकर-अमरावती, अविनाश साबापूरे-यवतमाळ, हनुमंत केंद्रे-नांदेड,नानासाहेब जाधव-नाशिक तथा उमरखेड दुध शितकरण केंद्र-कृष्णापूर फाटा ता.उमरखेड यांच्यासह इतरांचा समावेश पुरस्कार गौवरवात आहे.

          दरवर्षी प्रमाणे सहकार महर्षी भाऊसाहेब माने यांच्या स्मृतिदिना निमित्त,भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण,उमरखेड तर्फे कृषी शास्त्रज्ञ,शेतकरी,कृषी उद्योजक,प्रसार माध्यमे व कृषी विद्यार्थी यांच्यात संवाद होऊन आधुनिक शेती व प्रगतशिल शेतीतील आव्हाने स्विकारुन कृषी क्षेत्रामध्ये प्रगती करणा-यांसाठी दिला जाणारा राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार ह्या वर्षी दि.१४ जानेवारी २०२४ रोजी देण्यात येणार आहेत.

    विदर्भातील शेतक-यांच्या होत असलेल्या आत्महत्येला उपाय म्हणून,शेती संबंधीत सर्व अडचणीवर मात करीत शुन्यातून विश्व निर्माण करणारे व स्वकर्तुत्वावर स्वतःचे आर्थिक नियोजन करुन इतरांनाही आपल्यासोबत कार्यास प्रवृत्त करणारे, स्वतः सोबतच आपण समाजाचे सुद्धा हित साधू शकतो ही भावना जपणारे कष्टकरी, संशोधक शोधून त्यांचा यथोचीत सत्कार करुन त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सामान्यातील सामान्य शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व त्यातून मार्गदर्शन घेऊन इतरही शेतकरी बांधवांनी त्यांच्या सारखी शेती विषयक कार्यात भरारी घेऊन, सोबतच शेतीला पुरक व्यवसाय जोडून परंपरागत शेती व्यवसाया सोबतच दुग्ध उत्पादन, शेळी पालन, कुक्कुट पालन व इतरही असे अनेक पुरक व्यवसाय शेतीला जोडले तर नक्कीच त्या शेतक-यांची उन्नती व भरभराट होईल. शेतीला पूरक व्यवसाय कसे जोडावेत व अनेक अडचणींना समोर जात त्यातून मार्ग कसा काढावा या व अशा अनेक विषयांवर या सोहळ्यात उपस्थित पुरस्कारप्राप्त शेतकरी आपले अनुभव शेतक-यांना कथन करतील त्यांनी सांगीतलेल्या अनुभवातून आपल्या परिसरातील शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,कृषी विज्ञान मंचच्या माध्यमातून भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण हा उपक्रम २००६ पासुन राबवीत आहेत.

        प्रत्येक घटक आणि संलग्नीत कृषी महाविद्यालयामध्ये कृषी विज्ञान मंच या उपक्रमा अंतर्गत शेतकरी उपयोगी कार्य करण्यात नियोजीत केले होते.

        त्या अनुषंगाने कृषी क्षेत्रात सर्वात आधी शेती,सर्वात कमी खर्चाची शेती व दररोज पैसा देणा-या पुरक व्यवसाय करणा-या शेतक-यांना त्यांच्या महत्वपूर्ण सामाजिक योगदानाबद्दल सहकार महर्षी भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण-उमरखेड व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला संलग्न कृषी विज्ञान मंच कृषी महाविद्यालय, उमरखेड यांचे उपक्रमाद्वारे गेल्या ३० वर्षापासून दिल्या जाणा-या भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराची घोषणा डॉ. विजयराव माने, मार्गदर्शक भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण, उमरखेड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव वानखेडे व उपाध्यक्ष डॉ. गणेश जाधव आणि इतर निमंत्रीत कृषी शास्त्रज्ञ व अधिकारी ह्यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे, दररोज पैसा प्राप्त करणारे शेतकरी व इतर मान्यवरांची खालील प्रमाणे गटनिहाय निवड करुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

         ह्या बाबतचे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब ओझलवार यांचेकडून जाहीर करण्यात येत आहे.