भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री.जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय धानोरा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापिका डॉ. विना जंबेवार मॅडम, भैसारे मॅडम, निवेदिता वटक मॅडम, उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जयंती विषयी व महिलांसाठी केलेले कार्य याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्ष भाषणातून प्राचार्य डॉ पंकज चव्हाण सर यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन मनीषा किरंगे तर, आभार प्रदर्शन साक्षी कोतकोंडावार यांनी केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.