रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर:-
आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला अंजनाबाई दोडके होत्या.प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवडू बारेकर,माजी सैनिक पंढरी श्रीरामे,रामभाऊ मेश्राम,साधना श्रीरामे,सोनाली मेश्राम,सरिता भोयर,प्रतिमा भोयर,करुणा मेश्राम,सोनाली बारेकर,वनश्री दडमल,अंगणवाडी सेविका पद्माताई रिनके,मुख्याध्यापक सुरेश डांगे उपस्थित होते.
आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेतील विद्यार्थीनी तेजस्विनी भोयर आणि वैष्णवी मेश्राम यांनी सावित्रीमाईंची वेशभूषा केली.सावित्रीमाईंच्या जीवनकार्यावर सुरेश डांगे,सोनाली मेश्राम,सुवर्णा भोयर,वनश्री दडमल यांनी माहिती दिली.
सावित्रीमाईंनी केलेल्या कार्याचे विस्मरण न होऊ देणे हीच त्यांना खरी आदरांजली असेल असे मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी मनोगत व्यक्त केले.
शाळेतील विद्यार्थी तेजस्विनी भोयर,सेजल बारेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
मुलांची शाळा बंद होऊ नये यासाठी आवाज बुलंद करणाऱ्या गावातील ज्येष्ठ नागरिक अंजनाबाई दोडके,कोरोना काळात मुलांचं शिक्षण बंद राहू नये म्हणून आपल्या घरी मुलांना शिक्षण देणाऱ्या वनश्री दडमल या सावित्रीच्या लेकींना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी केले.आभार अर्चना डफ यांनी मानले.कार्यक्रमाला विद्यार्थी तथा पालक उपस्थित होते.