कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी : – जिल्हयातील माहे २०२२ चे निवृत्तधा रक शिक्षकांचे निवृत्ती वेतन (पेंशन) त्याच्या बँक खात्यावर जमा झाले असुन सुध्दा पारशिवनी तालु क्यातील निवृत्तधारक शिक्षकांचे निवृत्ती वेतन एसबीआय बँके शिवाय इतर बँकेत अद्याप जमा न झाल्याने निवृत्ती वेतन धारक शिक्षकांनी खंड विकास अधिकारी पं स पारशिवनी येथे एक दिवसीय निषेध व धरणे आंदोलन करून नियमित सर्व बँकेत निवृत्तधारक शिक्षकांचे निवृत्ती वेतन जमा करण्याची खंड विकास अधिकारी प.स.पारशिवनी,सभापती,उपस भापती,गटशिक्षाधिरी मँडम आदीना मागणी केली आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ निवृत्त वेतन धारकांचे निवृत्ती वेतन अनुदान (दि.८) डिसेंबर ला जमा झाले असुन (दि.२) जानेवारी २०२३ पर्यंत निवृत्तीवेतन एस बीआय बँके शिवाय जमा झालेले नाही. इतर सर्व तालु क्यात दि.१२ व १३ डिसेंबर २०२२ ला निवृत्ती वेतन निवृत्तीधारकाच्या खात्यावर वळती करण्यात आले.
ज्ञ फक्त पारशिवनी लालुक्यातच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फक्त खातेधारकांच्या खात्यावर दि.२६ व २७ डिसेंबर २०२२ ला जमा झाले.मात्र इतर बैंकेचे खात्यात पेंशन जमा का होत नाही.
ही आश्चर्याची बाब आहे.एवढा उशीर का ? माहे आक्टोंबरचे निवृत्ती वेतन १७ डिसेंबर २०२२ ला मिळाले. त्या वेळेस मात्र आपण अनुदान कमी असल्याचे कारण पुढे करून पेंशन दिली नाही. निवृत्त शिक्षकांचे पेंशन न देणारी फक्त पारशिवनी पंचायत समिती होती. आपल्या एकांगी निर्णयाने वयोवद्ध निवृत्तधारकाना औषधोपचार, कुंटुब पालन पोषणाच्या समस्यांना सामोरे जावे लागले.
पेंशन संबंधाने वारंवार निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेट घेऊन, विनंती करून ही पेंशन वेळेवर न देता फक्त चालढक लपणा, वेळ काढुपणाचे धोरण अवलंबिल्यामुळे भाव ना दुखावल्या आहे. संयम सुटत आहे. दर दोन महि न्यातुन एकाच महिन्याची पेंशन काढा. असा अलिखित आदेश आपल्या कर्मचा-याना आपण दिल तर नाही ना ? अशी शंका आंदोलन करणाऱ्या निवृत्त शिक्षकांनी व्यक्त केली.
उ़शीरा पेंशन मुळे निवृत्तधारकात संतापाची लाट उसळत आहे.पेंशन विलंबास कारणीभुत असलेल्या कर्मचा-यावर तातडीने कार्यवाही करावी व आपण सुद्धा पेंशन संबंधीचा आढावा घे़ऊ न दखल न घेतल्याने संतप्त भावना व्यक्त करण्या साठी सोमवार (दि.२) जानेवारी २०२३ ला खंड विकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी येथे उच्च श्रेणी मुख्या.व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महा सभा तालुका शाखा पारशिवनी व्दारे पंचायत समिती कार्यालय पारशिवनी परिसरात एक दिवसीय निषेध व शांततेत धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी,पारशिवनी तालुका पदाधिकारी बी.झेड.बोकडे,जे.बी.पनवेलकर,प्र.च.वैरागडे,डी.एन.झोड,रामदास काकडे,मधुकर कापसे,प्रकाश रंगारी,नबी शेख,रामभाऊ भक्ते,एस.एम.वसु,शांताराम जळते,लंगडे सर,बागडी सर सह शंभराच्यावर निवृत्तधारक शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते.