खल्लार/प्रतिनिधी
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील नालवाडा येथे विना परवाना देशी दारु विक्री करणाऱ्यास खल्लार पोलिसांनी काल 2 जानेवारीला धाड टाकून पकडले.
खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालवाडा येथील उमेश सुभाष खांडेकर वय 37 हा गावात विना परवाना देशी दारु विकत असल्याची गुप्त माहिती खल्लार पोलिसांना मिळाली. त्यानुसार ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार अनुराधा पाटेखेडे, पोहेकॉ ज्ञानेश्वर सिडाम,शरद डहाके, नाकील, संतोष चव्हान याच्या घरावर धाड टाकली असता उमेश खांडेकरच्या घरुन 1850 रुपयांची अवैध देशी दारुच्या 37 पावट्या व 2400 रुपये नगदी असा एकुण 4250 रुपयांचा मुद्देमाल सापडला.पोलिसांनी पंचासमक्ष सदर मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी उमेश खांडेकर विरुध्द अप न01/23, मुदाका 65(इ)नुसार गुन्हा दाखल केला आहे.