कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी: काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या नागपूर जिल्हा ग्रामीण चे जिल्हा कार्याध्यक्षपदी पारशिवनी पंचायत समितीच्या सभापती मंगला उमराव निंबोने यांची निवड करण्यात आली . भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार , प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात , प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे ही निवड करण्यात आली .