निलय झोडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार या घोषवाक्याने उदयास आलेल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संस्थेचे प्रणेते संस्थापक सचिव शिक्षणमहर्षी नंदलाल पाटील कापगते यांची 23 वी पुण्यतिथी नंदलाल पाटील कापगते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साकोली येथे वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती आर.बी.कापगते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.के.जी. लोथे , प्रा.स्वाती गहाणे, डी.एस.बोरकर ,एम.एम. कापगते, के.एम.कापगते व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापिका आर.बी. कापगते यांनी शिक्षण सम्राट नंदलाल पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच सांस्कृतिक विभागाच्या वतीने पाटील साहेब यांच्या जीवन चरित्रावर आधारित सुमधुर आवाजात श्रद्धांजली गीत सादर करण्यात आले.
नंदलाल पाटील साहेब यांनी साकोली तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर ,बहुजन समाजाचे मुलांसाठी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे जाळे निर्माण केले. ज्ञान, विज्ञान व सुसंस्कार या ब्रीदवाक्य प्रमाणे संस्थेचा विस्तार करून खेड्यापाड्यात उपेक्षित समाज घटकांपर्यंत ज्ञानाच्या प्रसार केला असल्याचे सखोल मार्गदर्शन करून पाटील साहेबांच्या संपूर्ण जीवन चरित्रावर प्रकाश टाकून विद्यालयातील प्रा. के. जी. लोथे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्राध्यापिका स्वाती गहाणे, डि. एस. बोरकर यांनी सुद्धा शिक्षण सम्राट नंदलाल पाटील साहेब यांच्या सोबत आलेले प्रसंग व त्यांचे व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला.
विद्यालयाचे मुख्याध्यापिका आर.बी. कापगते यांनी देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी स्वाभिमानी, कर्तव्यदक्ष, सृद्ढ आणि निरोगी मनाची भावी पिढी हवी आहे. देशातील असंख्य लोक आजही निरक्षर असून अज्ञान ,अंधकारात चाचपटत आहेत.
त्या सर्वांना सुशिक्षित, सुसंस्कारी बनविण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा गुरुमध्ये असतेच,विद्यार्थी हा जन्माने नाहीत तर आपल्या कर्माने, जिद्द, चिकाटी, मेहनतीने यशाचे शिखर गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे, विद्यार्थी हा स्वावलंबी व सुसंस्कारी बनण्याबरोबरच समाज व देशाच्या प्रगतीस हातभार लावावा असे ज्ञानवंत, गुणवंत विद्यार्थी घडणे आज काळाची गरज आहे ,असे मार्मिक विचार मुख्याध्यापिका कापगते यांनी व्यक्त केले.
यानिमित्ताने विद्यालयात निबंध स्पर्धा, पोस्टर मेकिंग, भावगीत, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना व व्यक्तिमत्व विकास दृढीकरणाच्या उद्देशाने तसेच विद्यालयामध्ये विविध व्यंजनाने भरलेला “आनंद मेळावा” ते सुद्धा आयोजन करण्यात आले.
या दिनाच्या औचित्य साधून विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्याचे उद्घाटन आदमने साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती साकोली यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने व मोठ्या उत्साहाने वर्ग 5 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन आर. व्ही.दिघोरे सर, एस.आर.देशमुख सर यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वीते करिता प्रा. सुमन पुस्तोडे, प्रा. सुनील कापगते , प्रा. नागोसे, राजेश कापगते, धनंजय तुमसरे, डी.आर.देशमुख, आर.सी.बडोले, आर.के. खोटेले, एल.एस.गहाणे, यु. एन.कटकवार, एस.व्ही. कामथे, एम.आर. शिवणकर, सोनाली क-हाडे, वेणू लिमजे, किशोरी लांजेवार व इतर प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन सहकार्य केले.