चिमूर तालुक्यातील मौजा गदगाव येथील बौद्ध नागरिकांनी धम्मातंर्गत लोकहितासाठी आरक्षित केलेली जागा नियमाकुल करण्यासाठी दिले आज निवेदन… — बोगस आदेश रद्द करण्याची निवेदनाद्वारे मागणी… — इतरांच्याही आस्थांचे (देवांचे) शासकीय जागेवर अतिक्रमण करून बस्थान असतांना,त्या समाजातील प्रमुखांना तहसीलदारांनी नोटीस का म्हणून दिल्या नाहीत?..

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

             महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चा कलम ५१ नुसार चिमूर तालुक्यातंर्गत मौजा गदगांव येथील प्लॉट नंबर २८.०८ आर इतकी जागा नियमाकुल करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते किशोर अंबादे यांच्या नेतृत्वात चिमूर तालुक्यातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांना आज निवेदन दिले.

       तद्वतच सदर निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना देण्यात येणार आहेत.

           याचबरोबर चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव,चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष बकाल यांनाही सदर आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

             चिमूर तालुक्यातील मौजा गदगांव बौध्द कमिटी महिला अध्यक्ष चंदाबाई प्रभुजी गेडाम व बौद्ध समाज बांधवांचे आबादी मधील खाली जागा क्षेत्र प्लॉट २८.०८ आर,इतक्या जागेवर मागील १५ वर्षापासून वहिवाट ताबा असून,त्या जागेवर विविध महापुरूषांचे कार्यक्रम ते सामुहिकपणे राबवीत असतात.

         १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती असो बुध्द जयंती असो,महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो विविध महापुरूषांच्या जयंतीचे व सार्वजनिक कार्यक्रम त्या जागेवर गदगाव येथील बौद्ध नागरिक व महिला भगिंनी घेत असतात. 

       सदरची जागा मालकी हक्काने करण्याबाबत मौजा गदगाव येथील बौद्ध पंचकमेटीच्या अध्यक्षांनी महसुल अधिकारी यांना अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे.

       मात्र आजपर्यंत सदरची जागा अर्जदाराच्या व बौद्ध पंचकमेटीच्या नावाने नियमानुकूल केलेले नाही.

        बौध्द समाजातर्फे त्या ठिकाणी १ हजार २० फुटाची टेन्ट उभे केले असुन पंचशील ध्वज सुध्दा उभा केला आहे.त्या ठिकाणी तथागत गौतम बुध्दांची मूर्ती सुध्दा,( १.५ फुट उंच मूर्ती) तीन फुट उंचीच्या सिमेंटच्या चबुत-यावर बसविली असून अंदाजे ७ हजार ९५६ फुट जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहे.

           ती जागा मौजा गदगाव येथील बौध्दांचे श्रध्दास्थान व आस्थेचे ठिकाण आहे.गदगांव मध्ये अनेक मंदिरे,हनुमान मंदिर,मॉ माणिका देवी मंदीर सह इतर मंदिरे अतिक्रमीत जागेवर गावात बसविले आहेत.

          त्याच प्रमाणे बौध्दांच्या आस्थेसाठी सदर अतिक्रमण जागेच्या ठिकाणी मागील अनेक वर्षापासुन लोकहितासाठी सार्वजनिक कार्यक्रम पार पाडले जात आहेत. 

       बौध्द धम्म हा शांतीचा असल्यामुळे आम्ही कुठलीही शांतता भंग आजपर्यंत गावात केलेली नाही असे मौजा गदगाव येथील बौद्ध समाजातील नागरिकांचे म्हणणे आहे.

         निवेदनात म्हटले आहे की,मौजा गदगाव येथील बुध्दांच्या आस्थांचे ठिकाण हटविण्यापूर्वी गावातील अतिक्रमण जागेतील इतर सर्व मंदिरे सुध्दा हटविण्यात यावे.तरच आमच्या बुध्दांचे पंचशील ध्वज हटविण्यात यावे,अन्यथा तहसीलदार सारखे तालुका न्यायदंडाधिकारी पक्षपात व भेदभाव करीत असल्यामुळे आणि कायदा,सुव्यवस्था भंग करीत असल्यामुळे त्यांचे विरुध्द व इतर पक्षपात भुमिका वटविणाऱ्या विरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत न्यायालयातून कारवाई करण्यात येईल याबाबत तहसीलदार श्रिधर राजमाने यांना सचेत करण्यात आले आहे.

            याचबरोबर चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली की,महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख अधिनियम १९६६ वा कलम ५१ नुसार सदरची जमीन नियमानुकूल करून आदेश पारित करावा व २९/११/२०२४ रोजी काढलेला बोगस आदेश तात्काळ खारीज करावा.

        सदर निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते किशोर अंबादे,भागवत बोरकर,अरविंद मोटघरे,उध्दव डेकाटे,नारायण कांबळे,अरविंद रामटेके,रोशन ढोक,प्रदीप मेश्राम,कृष्णदास रामटेके,बळवंत ठवरे,अँड.नितीन रामटेके,मिलींद राऊत,किशोर घोणमोडे,वासुदेव गायकवाड,मिलींद जांभुळकर,राजकुमार चुनारकर,अंजली मेश्राम,मनोज राऊत,आदर्श भैसारे,प्रमोद अंबादे,किशोर जांभुळकर,मोरेश्वर रामटेके,विजय मेश्राम,व इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.