सर्व महाराष्ट्रीयन जागृत नागरिकांच्या सदसदविवेक बुद्धीला आव्हान…. 

         जागृत नागरिकांनो येथील व्यवस्थेने आमच्या मताचा अधिकार हिरावून घेण्यासाठी कूटनितीचा आधार घेऊन EVM ला सेटिंग करुन त्यावरच आपण (जनतेने ) खापर फोडू नये म्हणून लाडकी बहीण, लाडका भाऊ, महिलांना एस. टी. बसचे अर्धे तिकीट, 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, इत्यादी योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महायुती सत्ताधाऱ्यांनी राबवल्या. त्याचप्रमाणे अब्जावधीचा चुराडा अनैतिक मार्गाने पैशाचा महापुर वाहीवला. त्याचे एकच उदाहरण पुराव्यासहित सापडले ते केवळ 9 लाख रुपयाची जप्ती. विनोद तावडेच्या प्रकरणाने…..

      परंतू , निवडणूक आयोगाने बघ्याची भूमिका घेऊन दुर्लक्ष करुन मौन धारण केले.

  म्हणजेच राजीव कुमार याने लोकशाहीचा गळा घोटला……..!

  धनंजय चंद्रचूड याने ( सर्वोच्च न्यायालयाने ) मोदीला गणपतीच्या आरतीला बोलावून घटनात्मक नितीचा खून केला……..!

    मोदी – शहाने मुख्य निवडणूक आयोगाच्या निवडसमितीतून सरन्यायाधीशांना कायदा करुन बाजूला करुन संविधान आणि लोकशाहीच्या एकाच वेळी नरडीचा घोट घेतला……..!

   EVM मनुस्मृतीने महाराष्ट्र विधानसभेतून विरोधी पक्षच मुळासहित उखडून टाकला……..!

        सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रात पाशवी बहुमत मिळून सुद्धा 10 दिवस होऊन सुद्धा सरकार स्थापनेसाठी मुहूर्त सापडेना………!

     इकडून तिकडून सापडला तर 5/6 डिसेंबरचाच मुहूर्त सापडला यातही RSS/ भाजपचे काय काळेबेरे असेल, ते तेंव्हाच कळेल…….!

           कारण आजपर्यंत या संघवाल्यानी असेच मुहूर्त शोधून काळे कारनामे करण्याचा इतिहास आहे……!

    उदाहरणार्थ…

सहा डिसेंबरचा बाबरी मजीद हल्ला…….!

     अशा डोईजड झालेल्या वृतीचे कारनामे किती दिवस आम्ही सहन करायचे…..?

      याच प्रश्नांचे आपण प्रत्येकाने उत्तरे शोधून त्यावर जागृती हाच एकमेव उपाय समजून 9 डिसेम्बर एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जागृत नागरिकांनी सर्व पक्षीय, सर्व सामाजिक संघटनेच्या, व विशेष म्हणजे नागरिकांच्या वतीने EVM वर झालेल्या निवडणुका आम्हाला मान्य नाहीत, पुन्हा नव्याने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन करावे…..

       ते सुद्धा जागृत नागरी कृती समिती स्थापन करून………

           आवाहनकर्ता 

           अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689