समर्थ महाविद्यालय लाखनी येथे जागतिक एड्स दिनाचा कार्यक्रम संपन्न…

 

चेतक हत्तीमारे 

 जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी:-स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक विभाग, ग्रामीण रुग्णालय लाखनी व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 1 डिसेंबर 2023 ला जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला.

          या दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय लाखनी येथील सीमा बावनकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी एच.आई.व्ही.बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व एच.आई.व्ही. टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगितले.

         या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, डॉ धनंजय गभने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. धनंजय गिऱ्हेपुजे, प्रा.लालचंद मेश्राम, तसेच डॉ. बंडू चौधरी उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून एड्स जनजागृती विषयक निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

        यात प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन प्राचार्य डॉ कापसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन चंद्रहास खंडारे, कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.बाळकृष्ण रामटेके यांनी केले तर आभार नोबेल घुसे यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी एन. सी. सी. व एन. एस. एस. चे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.