ऋषी सहारे
संपादक
आरमोरी- तालुक्यातील यशवंत कला उच्च माध्यमिक विद्यालय विहीरगाव कुकडी येथे दिनांक 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून बाहेरगावावरून शिक्षणासाठी ये जा करणाऱ्या मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले. संताजी समाजसेवा प्रतिष्ठान द्वारा संचालित यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय विहीरगाव कुकडी येथील विद्यार्थिनी जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावरून शिक्षणासाठी कनिष्ठ महाविद्यालयात येत असतात आणि त्यांच्याकडे ये जा करण्यासाठी कोणतेही साधन नव्हते, मानव विकास विभाग जिल्हा परिषद अंतर्गत सदर विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध करून देण्याबाबतचा निधी शासनाने त्यांना दिला आणि या निधीच्या अंतर्गत सर्व विद्यार्थिनींनी सायकल विकत घेतल्या आणि आता त्यांचा महाविद्यालयात ये जा करण्याचा प्रश्न समोर मिटविण्यात आला. जागतिक एड्स दिनाच्या वतीने साधून सदर विद्यार्थिनींना सदर सायकलीचे वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले, यावेळी विद्यालयाचे प्राचार्य जितेंद्र लाखनकर, प्राध्यापक संदीप ढेगरे, प्राध्यापिका कुमारी रजनी पिलारे,शिक्षक वाळके येथील कर्मचारी अफजल बेग तसेच वस्तीगृहाचे अध्यक्ष लोनगाडगे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिव व सदस्य आणि इतर मंडळी यावेळी उपस्थित होते.