ऋषी सहारे
संपादक
कुरखेडा-
वंचित समुहाच्या हितासाठी सत्ता काबीज करणे हेच लक्ष ठेऊन वंचित बहुजन आघाडीच्या गाव तिथे शाखा निर्माण करणे गरजेचे आहे असे प्रतिप्रादन वंचित बहुजन आघाडी पूर्व विदर्भाचे मुख्य संयोजक तथा माजी राज्यमंत्री डॉ रमेशकुमार गजबे यांनी केले.
वंचित बहुजन आघाडी कुरखेडा तालुक्याचा कार्यकर्ता मेळावा येथिल किसान मंगल भवनात आयोजीत करण्यात आला होता त्यावेळी ते उद्घाठक म्हणून बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटन डॉ रमेशकुमार गजबे यांच्या हस्ते करण्यात आले, मार्गदर्शक म्हणून राज्य कारयकारिणी सदस्य कुशलभाऊ मेश्राम, पूर्व विदर्भ निमंत्रक अरविंद सांदेकर, जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कुरखेडा तालुक्याचे प्रवक्ता डॉ फुलचंद रामटेके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे, जिल्हा संगटक भिमराव शेंडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष बाशिद शेख, हंसराज बडोले, युवा नेते चंदू नैताम, दिलीप बांबोळे, लता सहारे , गिता धारगावे, एजाज शेख आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना डॉ गजबे म्हणाले की, सामाजीक, आर्थीक , राजकियदृष्ट्या वंचित असणा-या विविध जातीतील वंचित समुहाला पक्षाची ध्येय धोरणे व उद्देश समजावून सांगून जागृत केले पाहीजे व पक्षात काम करण्याची संधी दिली पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी कुशल मेश्राम, अरविंद सांदेकर, बाळू टेंभुर्णे यांनीही मार्गदर्शन केले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा समायोचीत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष योगेश टेंभुर्णे यांनी केले तर संचालन तालुका महासचिव रवी डोकरमारे व आभार शक्ती गजभीये यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सदाशीव शेंडे, खेमराज धोंडणे, सिद्धार्थ आघात, पुणेश वालदे आदिंनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाला तालुक्यातील कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.