ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- आरमोरी येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जोगीसाखरा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या संघाने १४/१७ व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींनी खो-खो स्पर्धेत अजिंक्य राहून विद्यालयाची विजयाची परंपरा कायम ठेवली व जिल्हा स्तरावर आपले प्रवेश निश्चित केले, शालेय सत्र २०२२- २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या आरमोरी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे हितकारनि क्रीडा संकुल आरमोरी येथे आयोजन करण्यात आले होते, अतिम सामन्यात अत्यंत चुरशीची लढत झाली असून जवाहरलाल नेहरू विद्यालय जोगीसाखरा खेडाळू विद्यार्थ्यांनी मात करून जिल्हा स्तरावर प्रवेश निश्चित केला, सर्व खेडाळू विद्यार्थ्यांचे अभिनंदन हिरा मोटवानी संस्था अध्यक्ष किसान मोटवानी सचिव व सर्व सदस्य (गुरुनानक सोशिअल ट्रस्ट वडसा) शब्द सुमनाने केले व पुढील विजयाचे वाटचालीस शुभेच्छा दिल्या या यशाचे श्रेय खेडाळू नि आपले पालक, गुरुजन विद्यालयाचे प्रशिक्षक अजय सपाटे, महेश उरकुडे, प्रेमानंद मेश्राम प्राचार्य श्रीकृष्णा खरकाटे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद याना दिले. विद्यालयाचे मुख्याद्यापक श्रीकृष्णा खरकाटे, शिक्षक जि एच रहेजा आय आर डोके, एस आर हटवार दि एस नैताम यशवंत मरापे सर्व गावकरी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केलेत.