प्रतिनिधी//प्रलय सहारे

 

वैरागड : – येथील तेली वॉर्डांत वास्तव्यात असलेले राजेश बावनकर यांचा मुलगा श्रेयश राजेश बावणकर (वय 11 वर्षे) याचे शरीरातील काळीज, यकृत आणि पित्ताशय निकामी झाल्याने आज दिनांक 0२/१२/२०२२ रोजी सकाळी नागपूर येथिल एम्स रुग्णालयात उपचार सुरु असतांना १०.३० वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. 

 

श्रेयश राजेश बावणकर आरमोरी येथील आंबेडकर विद्यालय येथे पाचव्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याला अनेक महिन्यांपासून पोटातली बिमारी होती. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर लिवर खराब झाल्याचे डॉक्टरनी सांगितले. तीन महिन्याच्या उपचारानंतर आज त्याची नागपूर येथिल एम्स रुग्णालयात प्राणज्योत मालवली.

 

आज संध्याकाळी ०४:३० वाजताच्या दरम्यान येथील मानापुर रोड वरील वैलोचना नदीवर भावपूर्ण अश्रू नयनाने त्याच्यावर अग्नी संस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच आंबेडकर विद्यालयाने दुपारी शाळेला सुट्टी दिली. त्याच्या पच्यात आई-वडील आणि बोडणे मोठा परिवार आहे. एकुलता-एक मुलगा असल्याने परिवारातील आणि गावातील नागरिकात हळहळ व्यक्त करण्यात आली. 

 

 

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com