धानोरा /भाविक करमनकर
धानोरा: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा स्थळ- महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल चातगाव, येथे पार पडलेल्या स्पर्धेत जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा च्या चमू 14 वर्षे वयोगट कबड्डी मुले, 17 वर्षे वयोगट मुले – मुली खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे.विजय संघाचे अबूजमाड शिक्षण मंडळाचे सचिव. प्राचार्य एस. एम. पठाण, प्राचार्या लिना हकीम, मुख्याध्यापक बढाई, क्रीडाशिक्षक धुळसे, यांनी अभिनंदन केले आहे विजेत्या संघाने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक- शिक्षकेतर व पालकांना दिले.