निरा नरसिंहपुर दिनांक 2
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील वैकुंठवासी दानापा महाराज व पिंपरी बुद्रुक गावचे कुलदैवत पीरसाहेब बाबांच्या पावन भूमीमध्ये आखंड हरिनाम व गाथा पारायण सप्ताहाला प्रारंभ झाला.
स्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु मधुसुदन महाराज देहूकर (ज्येष्ठ फडधिकारी) यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर माजी अध्यक्ष श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू,, यांच्या हस्ते गाथा पूजन, विना व मृदंग पूजन ,झेंडा पूजन, गाथा वाचनासाठी प्रारंभ करण्यात आला. गुरुवर्य सोहम महाराज देहुकर (मळवली) यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंपरी बुद्रुक पंच क्रोशीतील सर्वच भाविक भक्त व गावातील सर्व ग्रामस्थ आणि, सहकारी व तरुण कार्यकर्ते, यांच्या सहकार्याने आखंड हरिनाम सप्ताह होत आहे. दिनांक.1/12/2022 ते 8 /12/2022 पर्यंत हरिनाम सप्ताह चालू राहणार.
आखंड हरिनाम सप्ताहासाठि 8 दिवस संपूर्ण, चहाची व्यवस्था आबासो बोडके यांच्याकडून,,, तर पिण्याचे पाणी, सकाळी नाष्टा, शरद बोडके यांच्या वतीने,, नित्यनेमाने लागणारे फुलांचे हारा नबीलाल शेख यांच्या वतीने देण्यात येत आहे,, पुडील सर्व इतर खर्च पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने करण्यात येत आहे. सप्ताहाच्या, 1) पहिल्या दिवसाची अन्नदान सेवा,, बबन बोडके, व्यंकट बोडके, गोरख बोडके,2) दुसऱ्या दिवसाची आन्नदान सेवा,, पिंपरी बुद्रुक येथील सर्व सुतार बांधव,,3) तिसऱ्या दिवसाची आन्नदान सेवा,, दत्तू बोडके, सूर्यभान बोडके, आशोक बोडके, रेवण बोडके, महादेव किरकत,4) चौथ्या दिवसाची आन्नदान सेवा नामदेव नारायण बोडके सह परिवार,,5) पाचव्या दिवसाची आन्नदान सेवा श्रीकांत बोडके, पोपट बोडके,,6) सहाव्या दिवसाची आन्नदान सेवा महादेव देव शेटे,,7) सातव्या दिवसाची आन्नदान सेवा,, सुनील बोडके, तुकाराम बोडके,, आबासो बोडके,8) आठव्या दिवसाची संपूर्ण 8 आन्नदान सेवा ज्ञानेश्वर बोडके, निलेश बोडके, दररोज नित्यनेमाने सकाळी अल्पहार व नाष्टा चहा, पाणी, शरद बोडके,
आजी, माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसेवक आणि ग्रामस्थ भाविक भक्त यांच्या वतीने ही संपूर्ण सेवा 8 दिवसाचे नियोजन व आयोजन करण्यात आलेली आहे.
गाथा पारायणाचे व्यासपीठ ह भ प रामभाऊ दत्तात्रेय शेळके महाराज गाथा भजन नेतृत्व गुरुवर्य सोहम महाराज देहुकर मळवली.तसेच रोजचे दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6,, काकडा आरती सकाळी 9 ते 12,,
गाथा भजन सायंकाळी 4 ते 6,, हरिपाठ रोज 6 ते 8, नंतर दररोज
भोजन, व दररोज नित्यनेमाने सायंकाळी 8 ते 10 किर्तन सेवा नंतर रात्रभर हरिजागर, रामभाऊ शेळके महाराज यांची कीर्तन सेवा झाली. तसेच इथून पुढे ह भ प मच्छिंद्र काकडे महाराज, ह भ प राम शेरकर महाराज, ह भ प दत्ता भोसले महाराज, ह भ प राम अभंग महाराज, ह भ प नंदू पवार महाराज, शेवटी सकाळी आठ ते दहा गावातून दिंडी प्रदक्षिणा घेऊन नंतर सकाळी दहा ते बारा या वेळेत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज गुरुवर्य हभप बापूसाहेब देहुकर महाराज,मळोली यांचे काल्याचे किर्तन होऊन,शेवटी महाप्रसाद घेऊन सांगता होणार, तसेच संध्याकाळी दत्त जयंती निमित्त भजन व कीर्तन होऊन दत्त जयंती साजरी केल्यानंतर लगेचच भारुडाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे.चालू आसलेला अखंड हरिनाम सप्ताह साठी, टाळकरी विणेकरी मृदुंग वादक आचारी, व ऐकणारे भाविक श्रोते आणि भजनी मंडळ वारकरी बहुसंख्येने सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित दररोज राहतात या कार्यक्रमाच्या सप्ताहासाठी सालाबाद प्रमाणे मंडप व डेकोरेशनचे काम टिंकू ढवळसकर बावडा यांचे नेहमीच सहकार्य असते.