दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : समाजात अनेक जण आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना कायम ठेवून निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करत असतात. मात्र, बर्याचदा त्यांचे कार्य समाजातील अखेरच्या घटकापर्यंत पोहोचतच नाही आणि त्यांची दखलही कुणी घेत नाही, अशी स्थिती सध्या दिसून येते. परंतु जसा फुलांचा सुगंध न सांगताच सर्वत्र दरवळतो त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करणार्या काही व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा सुगंध झील कांता इंटरनॅशनल सोशल फाऊंडेशनपर्यंत पोहोचला आणि त्यांनी त्याची दखल घेतली. संवाद आणि सन्मान हा अलीकडे कमी होत असताना त्यांनी घडवून आणलेला आजचा हा पुरस्कार सोहळा कौतुकास्पदच म्हणावा लागेल असे प्रतिपादन माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी केले.
झील कांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यातून आपला ठसा उमटवणाऱ्या रत्नांना राष्ट्रीय समाजगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,यात प्रामुख्याने निवृत्त पोलिस अधिकारी संपतराव जाधव, वृक्षमित्र साहित्यिक चंद्रकांत सहाणे, डॉ.ख.र.माळवे अशा अनेक रत्नांचा यावेळी स्मृतीचिन्ह, संविधान प्रत देऊन गौरविण्यात आले.यावेळी संविधान महोत्सव समिती यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुरस्काराचे वितरण माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड,माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण,डॉ.प्रेमिला तलवाडकर,डॉ.सतीष तारे,डॉ.सुषमा शेरावत,डॉ.कविता राव,डॉ.श्वेता वर्पे,अभिजित जोशी,प्रज्ञा कांबळे,हसीना इनामदार आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी कुलगुरू डॉ एस.एन.पठाण म्हणाले की डॉ.प्रेमिला तलवाडकर यांनी आपल्या आईच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी झील कांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी आदर्शवत उपक्रम राबवत आहे हे अभिमानास्पद आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रेमिला तलवाडकर यांनी तर सुत्रसंचालन स्वाती बालटे आणि आभार राजेंद्र सगर यांनी केले.