ग्रामीण भागातील कबड्डी हा आवडता खेळ :- डॉ.देवनाथ गंधारे… — मासळ येथील कबड्डी स्पर्धेचे उदघाटन संपन्न.

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर :-

         स्वराज्य क्रीडा मंडळ मासळच्या वतीने दिवाळी गोवर्धन सण निमित्त कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम घेण्यात आला असून ग्रामीण भागात कबड्डी आवडता खेळ असल्याचे मत सोशल माजी जि.प.सदस्य डॉ.देवनाथ गंधारे यांनी उदघाटना प्रसंगी व्यक्त केले.

    यावेळी सरपंच विकास धारणे,युवा नेते असिफ शेख पटेल गावातील प्रतिष्ठीत नागरिक आदी उपस्थित होते.

      या दरम्यान मासळ येथे सामाजिक एकोपा हा निरंतर राहावा आणि क्रीडा क्षेत्रातुन उत्तम असे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी स्वराज्य क्रीडा मंडळचा क्रीडा उपक्रम उत्तम असल्याचे मत असिफ शेख पटेल यांनी व्यक्त करीत येणाऱ्या काळात क्रीडा क्षेत्रात मदतीची साथ देणाऱ्याशी उभे रहावे असे त्यांनी सांगितले.

      सरपंच विकास धारणे यांनी स्वराज्य क्रीडा मंडळचा उपक्रम हा सतत राहावा आणि त्यांना आम्ही नेहमीच सहकार्य करणार असल्याचे सांगितले.या उदघाटन प्रसंगी क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.