प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
बहुजन समाज पार्टी मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये मजबूत स्थितीत असून या दोन्ही राज्यात बसपाने यापूर्वी आमदार व खासदार निवडून आणले आहेत.
१७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी अंतर्गत दोन्ही राज्यात बसपाची युती गोंडवाना गणतंत्र पार्टी सोबत झाली असून दोन्ही पक्षांचा जनाधार दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात आहे.
बसपा व गोंडवाना गणतंत्र पार्टी युतीचे उमेदवार मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये भाजपा आणि कांग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बऱ्याच विधानसभा मतदारसंघात टक्कर देणार असून अनेक ठिकाणी विजय संपादन करणार असल्याचे मतदार बोलू लागले आहेत.
१७ नोव्हेंबरला मध्यप्रदेश मध्ये विधानसभा निवडणूक अतंर्गत मतदान होणार असल्याने या राज्यात बसपा सुप्रिमो बहन मायावती यांच्या दिनांक ६,७,८,१०,व १४ नोव्हेंबरला बसपा व गोंडवाना गणतंत्र पार्टी उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होणार आहेत.
याचबरोबर भाजपा व काँग्रेस पक्षाच्या अनेक मातब्बरांनी बसपा मध्ये पक्ष प्रवेश केला असून ते बसपा कडून विधानसभा निवडणूक लढत आहेत.तद्वतच बसपाचे कदावर पदाधिकारी व कॅडरबेस कार्यकर्ता विधानसभा निवडणूक मैदानात उतरले असून ते जिकरीने निवडणूक लढवणार आहेत.
यामुळे मध्यप्रदेश व छत्तीसगड विधानसभा निवडणूक रनधुमाळीत तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.बसपा राष्ट्रीय पक्ष असल्याने यावेळी दोन्ही राज्यातील मतदार एकडेतिकडे न भटकता बसपा व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या बाजूने असल्याचे निवडणूक निकालानंतर दिसून येतील असेच राजकीय चित्र दोन्ही राज्याचे आहे.