देवाच्या आळंदीत उमटले जालन्यातील घटनेचे पडसाद… — आळंदीकर ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : जालन्यातील घटनेचे संपूर्ण राज्याभर पडसाद उमटले आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजने उपोषण केले होते. तेव्हा आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांनी आंदोलकानावर लाठी मार करण्यास सुरुवात केली. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे सुद्धा दिसून आले. 

           आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे समस्त ग्रामस्थ आळंदी आणि सकल मराठा समाज आळंदी यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तमराव गोगावले, रोहीदास तापकीर, डी.डी.भोसले पा., रमेश गोगावले, प्रकाश कुऱ्हाडे, अजय तापकीर, आशिष गोगावले, मनोज पवार, अनिकेत डफळ, तुषार तापकीर, मंगेश तिताडे, शशीराजे जाधव, बालाजी शिंदे, रामदास दाभाडे, चारुदत्त रंधवे, राहुल सोमवंशी, प्रविण घुंडरे, महेश महाराज मडके तसेच अनेक पक्षांचे प्रतिनिधी, सकल मराठा समाज व आळंदीकर ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.