वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

 

वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र व नवजीवन विचार मंच इंझोरी यांच्या अंतर्गत दि.०२/११/२०२२ बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले.त्यामध्ये पहिल्या दिवसांमध्ये अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत एकदिवसीय धर्मनिरिक्षता मूल्य आधारित कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेमध्ये युवकांना धर्मनिरक्षितेचे धडे देण्यात आले.आणि नेतृत्व कुणाकडे युवकांनी कशाप्रकारे वाटचाल करायला हवी या संदर्भामध्ये युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत मूल्याबाबत युवकांना माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून मा.सतिश भगत (अनुभव साथी) आणि मा.आशिष धोंगडे (अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक) मार्गदर्शन उपस्थित होते.प्रमुख उपस्थिती म्हणून मा. राजूभाऊ दिगडे व मा.आकाश हळदे यांची उपस्थित होते.एक दिवशी कार्यशाळेचे आयोजन अनुभव शिक्षकेंद्रातील मित्रांनी केले.अशा प्रकारे ही एक दिवशीय कार्यशाळा इंझोरी येथे संपन्न झाली…

 

आशिष धोंगडे

वाशिम प्रतिनिधी

दखल न्युज भारत

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com