पंकज चहांदे
दखल न्यूज भारत
आमगाव – सलग २७ व्या वर्षी तिरंगा क्रिकेट क्लब आमगाव यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे समारोप करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन खास दिवाळी च्या शुभ पर्वा वर दिनांक २६ आक्टोबर ला आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णाभाऊ गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धे करीता प्रथम , द्वितीय व तृतीय पुरस्कार १५००१₹, १२००१₹ व ८००१ ₹ अनुक्रमे ठेवलेले होते. त्यामध्ये आमगाव चे सि. एम. क्रिकेट क्लब हे पहिले पुरस्काराचे मानकरी ठरले. तर द्वितीय तिरंगा क्रिकेट क्लब व तृतीय पुरस्कार हे कुरुळ येथील स्व. अजय क्रिकेट क्लब ला प्राप्त झाले.
त्या करीता आज ह्या पाच दिवसीय स्पर्धेची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रम मध्ये अध्यक्ष म्हणून गावातील प्रतिष्ठीत नागरिक केवळरामजी घोरमोडे हे होते. तर बक्षीस वितरक म्हणून अरविंदभाऊ राऊत चौगान हे होते. ह्या कार्यक्रम करीता काही मान्यवर उपस्थित होते. ह्यामध्ये रमेशजी ठाकरे, योगेश नाकतोडे, प्रभाकर चौधरी, लोमेशराव देशमुख सोनी, अमोल नाकाडे,सचिन फाये,सागर नाकाडे,विश्वेश्वर बेहरे कोंढाळा, राजू भाऊ बुल्ले,ग्रा. प. कर्मचारी, सोनलताई घोरमोडे, राजूभाऊ कोल्हे, श्रीधर पाटील, गावचे तलाठी वनकर, माधवराव चंडीकार,विठ्ठल नखाते, अनिलजी निकम, डॉ. विवेक चव्हारे,निलेश तितीरमारे मुख्याध्यापक, सतिश प्रधान, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक शेंदरे,घनश्याम लाडे,संपत कावळे, देवराव पाटिल, शंकर वालदे,नानाजी कोल्हे, भरत देशमुख, मंगेश गुरफुले,ज्ञानेश्वर ठाकरे, नेताजी प्रधान, अखिल रोहनकर,आकाश दोनाकर, प्रकाश ठाकरे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज घोरमोडे व आभार गजेंद्र काळबांधे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तिरंगा क्रिकेट क्लब आमगाव चे सर्व सदस्य तथा गावकऱ्यांनी सहकार्य केले.