वाशिम जिल्हा प्रतिनिधी/आशिष धोंगडे
वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्रा अंतर्गत दि.१/११/२०२२ रोजी संध्याकाळी ८ वाजता अमरावती वाशिम जिल्ह्यातील युवकांसोबत ऑनलाईन पद्धतीने बैठक घेण्यात आली.
यामध्ये अनुभव शिक्षा केंद्रांतर्गत युवा स्पंदना बाबत चर्चा करण्यात आली.चर्चेमध्ये अनुभव शिक्षकेंद्रांतर्गत युवा स्पंदन काढण्याचे युवकांनी ठरवले.त्यामध्ये वाशिम अमरावती जिल्ह्यातील युवकांनी युवा स्पंदनासाठी आपल्या जवळ असलेले साथींचे अनुभव,लेख,कविता, चारोळ्या,यशोगाथा व्यंगचित्रे, तातडीने पाठवण्याचे आवाहन अनुभव शिक्षकेंद्राचे अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक आशिष धोंगडे यांनी केले आहे.
यामध्ये युवकांचे कलागुण प्रसिद्ध करून युवा स्पंदनाच्या माध्यमातून युवकांना स्कोप निर्माण करण्यासाठी या बैठकीमध्ये युवा स्पंदनाबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीच्या आयोजन अनुभव शिक्षकेंद्राच्या वाशिम जिल्हाध्यक्ष कु.दिव्या देशमुख यांच्या माध्यमातून बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.
या ऑनलाईन बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून मा.चंद्रशेखर डोईफोडे (जि.प.सदस्य वाशिम) प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनुभव शिक्षा केंद्र वाशिम जिल्हा प्रशिक्षक मा.श्री.आशिष धोंगडे यांनी युवकांना युवा स्पंदनाबाबत मार्गदर्शन करून वाशिम अमरावती जिल्ह्यातील युवकांना आव्हान केले आहे.
आपल्यायशोगाथा,लेख,कविता,चारोळ्या व्यंगचित्र,तातडीने पाठवावे जेणेकरून युवा स्पंदनामध्ये घेतल्या जाणार आहे.अशा प्रकारे ऑनलाईन बैठकीमध्ये युवकांसोबत संवाद करण्यात आला.या बैठकीमध्ये वाशिम व अमरावती जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि युवतींचा सहभाग होता.अशाप्रकारे ही बैठक संपन्न झाली…..