पारशिवनी –
नगरपरिषद अंतर्गत कामात अडथळा निर्माण करण्याच्या संबंधाने काल दिवाणी फौजदारी न्यायालयातंर्गत विद्यमान न्यायमूर्ती यांनी निर्णय दिला असून आरोपीला १ वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पो.स्टे .पारशिवनी : – दिनांक ०४/ अगस्त /२०२० चे १ ९ .४५ वा . दरम्यान फिर्यादी नामे – रामकिसन आभा सदगर , वय २ ९ वर्ष , कार्यालयीन अधिक्षक नगर पंचायत पारशिवनी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे . पारशिवनी येथे अप . क्र . २१३ / २०२० कलम ३५३ , १८८ , २६ ९ , ५०४ , ५०६ भादवि सहकलम ०३ महामारी रोग.प्रति कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
प्राप्त माहीती नुसार – दिनांक ०४/ अगस्त /२०२० चे १ ९ .४५ वा . फिर्यादी हे नगर पंचायतचे कर्मचारी सहा . प्रभाग क्र . १३ येथे कंटोमेंट झोन तयार करणे करीता गेले असता आरोपी नामे – लिलाधर पंजाबराव कवडे , वय ३४ वर्ष , रा . पातीमाता मंदिर तेलीपुरा वार्ड क्र . ०३ पारशिवनी याने नगरपंचायत कर्मचाऱ्यांना बॅरिकेट बांधण्यास अडथळा निर्माण करून त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
फिर्यादीच्या रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होतासदर प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री.ज्ञानोबा पळनाटे पोस्टे पारशिवनी यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता कोर्टामध्ये सादर केले होते.
०१/ नवंबर /२०२२ रोजी कोर्ट विद्यमान न्यायाधीश श्री . पावसकर यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३५३ , ५०४ , ५०६ भादंवि मध्ये ०१ वर्ष सश्रम कारावास तसेच प्रत्येकी ५००० / – रू.दंड ,दंड न भरल्यास ०६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे .
सरकारचे वतीने एपीपी श्री . नंदनवार यांनी काम पाहीले . कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन स.फौ.किशोर निंबाळकर , पोस्टे पारशिवनी यांनी मदत केली आहे .