कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- आज मंगलवार रोजी जागतिक वन्यजीव सप्ताह अनुषंगाने सुरेवानी पर्यटक गेट येथे मा.वनपरिक्षेत्र अधिकारी,बफर क्षेत्रालगताच्या गावचे सरपंच,पोलीस पाटील, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन समिती अध्यक्ष इ.यांनी मौजे महारकुंड जि. प.शाळेतील विद्यार्थी यांच्या समवेत सफारी गेटचे उद्धाटन केले.उद्धाटन नंतर जिप्सी चालक मालक,गाईड यांच्यासह जिप्सीस हिरवा झेंडा दाखवून विद्यार्थ्यांच्या जंगल सफरीला सुरुवात झाली.
तदनंतर वन्यजीव जागृतीपर वन क्षेत्रालगतच्या गावांमध्ये बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले.रॅली मध्ये सर्व उतस्फुर्तेने सहभागी झाले.नंतर धनेश पर्यटन संकुल येथे चर्चा व परिसंवाद झाला तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याकरिता मानवी मुखवटे गुराखी व ग्रामस्थ ह्यांना वाटप करण्यात आले.
ज्ञज्ञज्ञज्ञज्ञत्यामध्ये सिरोंजी-सुरेवानी चे सरपंच श्री.पूनमजी भिमटे यांनी वने व वन्यजीव यांची माहिती सांगून शेतकऱ्यांना शेत पिक नुकसान व पशुधनहानी याबद्दल येणाऱ्या अडचणी सांगितल्या तर नागलवाडी गावच्या सरपंच श्रीमती दिपाली ठाकरे यांनी वनविभाग व गावकरी यांच्या संबंधाबद्दल सांगून वन विभागाला सहकार्य करू असे सांगितले.
सदर प्रसंगी सुरेवानी गावचे पोलीस पाटील श्री.अनिल वरखडे, नागलवाडीच्या पोलीस पाटील श्रीमती सुलोचना उईके, नागलवाडी जन वन समिती अध्यक्ष श्री हरीश मोटघरे, महारकुंड जन वन समिती अध्यक्ष श्री प्रपिल धूर्वे,ग्रामस्थ दिलेश्वर भिमटे,संजय गिरमेकर व सर्व वन कर्मचारी उपस्थितीत होते.
शेवटी वन परिक्षेत्र अधिकारी श्री प्रवीण लेले यांनी उपस्थित सर्वांना वन्यजीव संरक्षण व संवर्धन यांबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.मांडलेल्या समस्यांचे निरसन करून गावकरी व कास्तकार यांना सहकार्य करू असे आश्वस्त केले आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले.