श्रमदानातून केले समाजसेवक बांधवांनी तुटलेल्या रोडची दुरुस्ती…

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

          काल दि.१ ऑक्टोंबर २०२४ ला प्रभाग क्रमांक 12 व 13 येथे रस्त्यांनी जात असताना खराब रस्त्यामुळे अडचणी येत होते. हा रस्ता मुख्य रोडला संलग्नित असून या रस्त्याकडे स्थानिक नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले होते.

            या बाबी स्थानिक नगरसेवक आणि प्रशासन यांना सांगून सुद्धा त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले,रस्त्याने कित्येक पालक आपल्या मुलांना कॉन्व्हेंट ला सोडायला जातं होते आपल्या लहान मुलांना आपल्या दुचाकी वाहणावर जपून या रस्त्याने जातं होते त्यांना या अडचणींचा सामना करावा लागतं होता.

             कित्येक लोकांचं या खराब रस्त्यामुळे अपघाताला सामोर जावं लागलं, तसेच वाहतुकीला या रस्त्याचा मुख्यतः उपयोग होत असतांनाही प्रशासनाचे दुर्लक्ष ही चिंतेची बाब लक्षात घेता धानोरा येथील साईबाबा मित्र परिवार तसेच समाजकारणात रस घेणाऱ्या युवकांनी स्वखर्चाने पुढाकार घेऊन श्रमदानातून रस्त्याचे काम केले.

           यावेळी धानोरा येथील समाजसेवक मलिक बुधवानी, महेश चिमुरकर, जमीर कुरेशी, रवी येलसलवार, गणेश कुळमेथे, मुकेश बोडगेवार, अफरोज शेख, गणेश चिमुरकर, चिमा चिंचोलकर, विनेश गावडे, पंकज देविकार, महेश चौधरी, अभिजित राखडे, ऋषभ रडके, अमित मेश्राम, मंगेश नरचुलवार, रोहित लाजूरकर, निलेश मत्ते, शब्बीर शेख, अंशुल नैताम, दीपक परतवार, सुखदेव मातलामी, आदित्य कोटांगले, भूषण भैसारे व मित्रपरिवारातील सर्व सदस्य यांनी श्रमदान केले…