ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली:नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल सीबीएसई साकोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान या घोषणेने देशाच्या इतिहासात कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे दिवंगत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जंयतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
अध्यक्ष प्राचार्य मुजम्मिल सय्यद, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका वंदना घोडिचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास व प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन, माल्यार्पण करून करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर व कार्यक्रमाचे अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व थोर स्वातंत्र सेनानी लाल बहादूर शास्त्री यांच्या जिवनकार्याबाबत अतिशय मोलाची माहिती दिली. क्षमा हे बलवानाचं लक्षण आहे दुर्बल कधीच क्षमा करत नाही या तत्त्वाचे अवलंब करावे तसेच या महान नेत्यांनी देशहितासाठी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करून व त्यांचे गुण अंगिकारून देशकार्यात सहभागी व्हावे असे आव्हान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतिश गोटेफोडे, जयंत खोब्रागडे, अजय बाळबुद्धे, किशोर बावनकुळे, विन्नुष नेवारे, श्रीधर खराबे, अशोक मीना, विजय परशुरामकर, जोशिराम बिसेन, प्रशात वालदे, सरताज साखरे, रोझी पठान, सुनिता बडोले, विशाखा पशिने, वैशाली भगतकर, दिपा येले, पुण्यप्रभा उपासे, रुनाली पंधरे, प्रियंका निंबेकर, प्रतिमा डोंगरे, स्वेजल टेंभुर्णे, माधुरी हलमारे, ज्योती डोंगरवार, लिलेश्वरी पारधी, वैशाली राउत, रेखा हातझाडे, स्मिता मस्के, माधुरी बन्सोड, अनिता धुर्वे, मेघा संग्रामे, प्रगती हुमने तसेच इतर शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अनिता धुर्वे व आभार माधुरी बन्सोड यांनी केले.