सावली (सुधाकर दुधे)
गांधीजींच्या तीन बंदरांनी बुरा मत देखो,बुरा मत कहो,बुरा मत सूनो असा संदेश दिला होता.आता सारं उलटं झालं आहे. इडीला सांगितलं.हमारे तरफ इडी,सिबीआय,इक्मटॕक्स हे तीन बंदरे आहेत.या तीन बंदराना सांगितलं गेलं आहे.जितकं वाईट करता येईल तितकं वाईट करा. जेवढं वाईट ऐकता येईल ऐका अन जेवढं वाईट बघता येईल तितकं बघा.कठीण स्थिती झालीयं देश्याची.लोकशाही नांदेल ? संविधान आहे,गांधीजींचे विचार आहेत म्हणून आम्ही आहोत.मात्र हे सर्व संपवून टाकतील,असा घणाघात आमदार आणि काँग्रेस विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर केला.” गांधीजी के रास्ते ” पदयात्रेचा आज सावली येथे समारोप झाला.त्या प्रसंगी वडेट्टीवार बोलत होते.
चंद्रपूरला गांधीजीनी तीन भेटी दिल्या होत्या.दोन भेटी अल्पकालीन,धावत्या भेटी होत्या.मात्र तिसरी भेट विस्तृत स्वरूपाची ठरली.सावली या गावात महात्मा गांधीजींचे अधिवेशन पार पडले.गांधीजींच्या आठवणींना आणि गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठी काँग्रेसच्या प्रोपेशनल विंगने चंद्रपूर ते सावली अशी तीन दिवशीय ” गांधीजी के रास्ते ” पदयात्रा काढली.चंद्रपूरचा रेल्वे स्टेशन येथून पदयात्रेला सूरवात झाली.75 कि.मी.अंतर कापून आज ( रविवार ) पदयात्रा सावली येथे पोहचली.पदयात्रेचा समारोप सावली येथिल चरखा संघचा पटांगणात करण्यात आला.यावेळी माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार,माजी आमदार नामदेव उसेंडी,काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे,रामु तिवारी,मनिष तिवारी ,संदिप गड्डमवार,दिनेश चिटनूरवार,सावलीचे नगराध्यक्ष लता लाकडे ,उपाध्यक्ष संदीप पुण्यपकर ,विजय मुत्यालवार, अर्जूनकर,गिलानी,के.के.सिंग उपस्थित होते.पदयात्रेत सहभाग घेतलेल्यांचा खादीमाळ टाकून सत्कार करण्यात आले.