वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

 

वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत दि.०२/१०/२०२२ ते ०४/१०/२०२२ होत असलेले नागरी समाज व स्थानिक युवक नेतृत्व अभ्यासक्रमाचे मौजे बेलखेड कामठा येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे व पूजन हार अर्पण करून महात्मा गांधीजींच्या जयंती साजरी करण्यात आली व तसेच पुढील टप्प्यांमध्ये नागरी समाज व स्थानिक युवक नेतृत्व अभ्यासक्रमाचे उद्घाटन संपन्न.

उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून कारंजा येथील गटविकास अधिकारी मा.श्री.साईकिरण पडघन यांच्या हस्ते स्थानिक नेतृत्व अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा.चंद्रशेखर डोईफोडे (जि.प.सदस्य वाशिम) मा.श्री.सुरेश लुले (अनुभव शिक्षा केंद्र विभागीय समन्वयक विदर्भ) प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.राजु भिसे मा.श्री.सुरेश बहुटे मा.सौ. मीनाताई साऊतकर (सरपंच बेलखेड) मा.श्री.खाडे (ग्रामसेवक) मा.आशिष धोंगडे (अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक) स्थानिक नेतृत्व अभ्यासक्रमामध्ये उपस्थिती होती.

 

या अभ्यासक्रमामध्ये गटविकास अधिकारी पडघन यांनी प्रशिक्षणार्थी यांना युवकांनी नेतृत्व गुणाकडे वाटचाल करणे काळाची गरज आहे.या कार्यक्रमांमध्ये पडघन साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणामध्ये वाशिम जिल्ह्यातील मालेगाव,वाशिम,रिसोड,मंगरूळपीर,मानोरा,कारंजा येथील तालुक्यातील युवक व युवतींचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे. अशाप्रकारे नागरी समाज व स्थानिक युवक नेतृत्व अभ्यासक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यशाळेच्या पहिले दिवसातील दुसऱ्या टप्प्यांमध्ये मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय राजू दादा भिसे यांनी युवकांना स्वतः मधले असलेले गुण कशाप्रकारे शोधावे आणि स्वतःला कसं नेतृत्व कुणाकडे पाहावं यासंदर्भामध्ये ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून नेतृत्व किंवा स्वतः मधले असलेले उनिवा कशाप्रकारे शोधायला पाहिजे हे त्यांनी त्यांच्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून च मार्गदर्शनातून सांगण्याचा प्रयत्न केला यामध्ये स्वतःची ओळख काय आहे. राजकीय क्षेत्रामध्ये माझी ओळख काय निर्माण करायची आहे. स्वतःच्या ताकती काय आहे आणि ते कशाप्रकारे वापर करायच्या आणि ध्येय काय आहे. स्वतःमध्ये असलेल्या कमजोरी काय आहे हे शोधणे आणि ते कशाप्रकारे दूर करता येणार आहे याकडे आपण स्वतःने लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे असे त्यांनी मार्गदर्शनामध्ये सांगितले आहे..

 

आशिष धोंगडे

वाशिम प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com