दखल न्युज भारत 

आरमोरी टिम

आरमोरी :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी येथील रामसागर तलावामध्ये तरुणाच्या मृतदेह आज आढळून आला.

सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की आदित्य विनोद शिंदे वय 21 वर्ष मु. देवरी जिल्हा. गोंदिया येथील तरुण कुंभार मोहल्ला यामध्ये वास्तव्यास होता

परंतु कालपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार मयतचा लहान भावाने पोलीस स्टेशनला दिली होती. त्याचा इकडे तिकडे शोधाशोध करण्यात आला तो मिळाला नाही.

दरम्यान आज राम सागर तलाव या ठिकाणी 1.30 वाजता दरम्यान सदर तरुणाचे प्रेत आढळून आले. या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आले. त्यानंतर सदर प्रेत शविच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालय आरमोरी येथे आणून शविच्छेदन करण्यात आले व पोलिसांनी मर्ग घोषित केला.

पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास रमेश लिंगायत व चिकनकर मेजर करीत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com