प्रतिनिधी:पारशिवनी तालुक्यातील चारगाव (मकरधोकडा) येथे क्रॉपसिटी ॲग्रो. प्रा. लिमि. कोल्हापूर व आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान यांचे संयुक्त विद्यमाने दि. १ आक्टोबरला ‘महोगनीतून आर्थिक क्रांती’ या विषयावर’ चर्चासत्र घेण्यात आले. याप्रसंगी वृक्ष लागवड तज्ज्ञ भारती ताकसांडे यांनी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मंचावर सरपंच भगवान गद्रे, सामाजिक कार्यकर्ता सुरेश बगमारे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. 

      यावेळी बोलतांना भारती ताकसांडे यांनी “सततच्या नुकसानीमुळे मनोबल खचलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अर्थक्रांती घडवून आणण्यासाठी महोगनी वृक्ष लागवड ही निश्चितच वरदान ठरणार असून शासन स्तरावरून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाबाबद सर्व अडचणी दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाशझेप फाऊंडेशनचे सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला परिसरातील उपक्रमशील शेतकरी शिवदास बगमारे, पवन ढोरे, प्रवीण धूर्वे, सुरेश सोनबरसे, सतीश राऊत, शेषराव बागमारे, रामदास गजभिये, धर्मदास भूर्रे, भोजराज बेदरे, दीपक राऊत, शामराव गोळंगे, राजकुमार बोरीवार, हिराचंद बर्वे, रंगराव गोळंगे, भीमराव गोळंगे, छोटू मेश्राम, विलास बेदरे, बाबा बेदरे, नाना बेदरे, बाळकृष्णा राऊत, सचिन तुपट, जनार्दन मोहिजे, अशोक गद्रे, नंदू कावळे यांचेसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com