नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

 साकोली: नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे 2 ऑक्टोंबर रोजी सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चा नारा देणारे लालबहादूर शास्त्री या दोन थोर महापुरुषांची जयंतीचा कार्यक्रम विद्यालयात साजरा करण्यात आले.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक के. एस. डोये यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एम.टी.कोचे सर, सौ.आर.बी. कापगते मॅडम, प्रा. एन. पी. बावनकर सर, कु. एम.एच.उपाध्ये मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते. 

   गांधीजीच्या विचारात माणुसकीने एकमेकांचे शब्द पाळणे, अहिंसात्मक लढा देणे यांना फार महत्त्व होते. गांधीजींनी आपले आयुष्य सत्तेच्या शोधासाठी अर्पण केले असून सत्य व अहिंसेचे तत्वे जीवनात प्रत्येकाने आचरणात आणून आपल्या हातून समाजाची राष्ट्राची व देशाची सेवा घडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे,असे मौलिक विचार कु.एम.एच. उपाध्ये मॅडम यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष के.एस.डोये यांनी शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी थोर मोठ्यांची चरित्रे वाचून त्यांच्या आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी बाणवला पाहिजे,तसेच स्वच्छतेविषयीचे महत्व व तंबाखूमुक्ती उपक्रमाद्वारे जनजागृती कशी करता येईल याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.

   कार्यक्रमाचे संचालन आर. व्ही. दिघोरे सर यांनी तर आभार प्रदर्शन के. एम. कापगते सर यांनी केले.

   कार्यक्रमाचे यशस्वीते करिता विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News