हनुमान मंदिराच्या प्रांगणात बैल पोळा निमित्त शेतकऱ्यांना शिवसेना ऊ बा ठा पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         बैल पोळा म्हटले की शेतकऱ्यांचा मोठा सण, वर्ष भर शेतकऱ्यांच्या शेती कामा साठी राबणाऱ्या बैल जोडीला बैल पोळ्याच्या दिवशी सजवून सार्वजनिक हनुमान मंदिराच्या प्रांगणात पूजा केल्या जाते आणि गोड अन्नाचे जेवण नैवेद्य दिल्या जाते.आज कुरखेडा येथे ही बैल पोळ्याचे दरवर्षी प्रमाणे हनुमान मंदिर कुरखेडा येथे साजरा करण्यात आला.

            तसेच दुपट्टा व नारळ देऊन शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले आणि जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना आणि गावातील प्रतष्ठित नागरिकांना शिवसेना उ बा ठा च्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल उपजिल्हा प्रमुख महेंद्र कुमार मोहबंसी, वी हि प.चे वामनराव जी फाये साहेब, विलास गावंडे ,भाजप नेते माजी नगराध्यक्ष रवींद्र जी गोटेफोडे ,नगर सेवक ऍड वालदे, माजी नगरसेवक पुंडलीक देशमुख,पाणी पुरवठा सभापती अशोक कंगाली यांनी शेतकऱ्यांना बैल पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या.

           या प्रसंगी रिटायर्ड पोलिस उप निरीक्षक अमृत मेहेर, राहुल गिरडकर भास्कर देशमुख तसेच भाजपचे उल्हास देशमुख, अशोक मेश्राम सर, नामदेव जी बनपुरकर,बाबुरवाजी देशमुख, कालबंधे, कोंप्रतीवार सह परिसरातील नागरीक हजर होते.