रामदास ठूसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर:- महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अंतर्गत नगर परिषद चिमुर प्रभाग ११ मासळ चौक चावळी मोहल्ला येथे रविवार ला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ६ कोटी रूपये निधी चे श्री संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह बांधकामाच्या भुमीपूजनाचे उद्घाटक चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार बंटीभाऊ भांगडिया,अध्यक्ष जेष्ठ समाज सेवक प्रा महादेव पिसे, प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ तेली समाज केंद्रीय अध्यक्ष रघुनाथ शेंडे, यशवंत खोब्रागडे प्रकाश देवतळे, संत जगनाडे भुपेश लाखे डॉ गोपाल वाघमारे डॉ बाळू पिसे निलम राचलवार नथ्थू तळवेकर प्रदिप बंडे राजु अगडे लता अगडे मनिषा कावरे पुष्पा हरणे मिनाक्षी बंडे घनश्याम डूकरे भास्कर बावनकर श्रेयश लाखे यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी श्री संत जगनाडे महाराज कल्याणकारी मंडळ चिमुर च्या सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार व संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.