माझ्या हातून चांगले काम करण्याचं बळ तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या आशीर्वादानेच :- आमदार किर्तीकुमार भांगडीया…– भांगडीया फाऊंडेशनने थायलंडवरून मागविली बुध्दमुर्ती…

       रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :- भांगडिया फाऊंडेशन यांच्या अथक प्रयत्नाने व गगन फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनात थायलंड येथून तब्बल आठ फूट उंच ध्यानधारण अवस्थेतील दोन बुद्धमूर्ती ची प्रतिमा भद्रावती मार्गे गुजगव्हण येथील बुद्धकुटीवर आणण्यात आली.

           या ठीकाणावरून मालेवाडा सुगतकुटी येथे रॅलीव्दारे नेण्यात आले.या बुद्ध मूर्तीचे भंते डॉ. धम्मचेती यांनी विधीवत पूजन करून खानगाव, बोथली, वाहनगाव, खडसंगी, चिमूर मार्गे बुद्ध मूर्तीचे स्वागत करत धम्ममय वातावरणात पुजन व पुष्पगुच्छ टाकत सुगतकुटी मालेवाडा येथे नेण्यात आले.

          चिमूर विधानसभाक्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी सुगतकुटी मालेवाडा येथे बौध्द विहारासाठी तब्बल पाच कोटी रुपये मंजूर करून विहाराचे बांधकाम पूर्णत्व केले. मात्र या विहारात बुद्ध मूर्ती नसल्याचे लक्षात येताच आ. बंटी भांगडीया यांनी भांगडिया फाऊंडेशनच्या माध्यमातुन थायलंड येथून दोन बुद्ध मूर्ती मालेवाडा सुगतकुटी येथे भेट स्वरूपात दिले. 

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आमदार बंटी भांगडिया यांनी सांगितले की, आपण चिमूर विधानसभा क्षेत्राचा पुर्ण कायापालट करण्याचं काम करत आहोत. मी आमदार होण्याआधी युवाशक्ती स्थापन केली तेव्हा सर्वात आधी जर मी काम केले असेल तर ते मालेवाडा सुगतकुटी येथील विज पुरवठा व्यवस्थेचे काम पहिले केले. त्यामुळे माझ्या हातून चांगले काम करण्याचं आपल्याला बळ तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या आशीर्वादाने मिळत आहे.

               यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया कार्यक्रमांचे प्रमूख अतिथी म्हणुन डॉ.भंते धम्मचेती व भिख्खू संघ संघारामगिरी हे उपस्थित होते. तर कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणुन जयंता गौरकार, जितेंद्र मोटघरे, भाजपा तालुकध्यक्ष राजू पाटील झाडे, मनिष तूमपल्लीवार, घनःश्याम डुकरे, भिमराव ठावरी संजय घुटके,आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

                 यावेळी मालेवाडा येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.