जोपर्यंत EVM +VVPAT हटणार नाही…….

आणि बॅलेट पेपरवर निवडणुका होणार नाहीत……..

  तोपर्यंत आपल्या मताचा अधिकार आणि लोकशाही व संविधान पुनरुजीवित होणार नाहीत.!

           ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील सर्व प्रकारच्या कृत्रिम आजाराची सुरुवात मादक पदार्थाच्या ( तंबाखू , बिडी, सिगारेट, ताडी, माडी, बियर, देशी विदेशी दारू, अफू, गांजा, चरस, ड्रग्ज, इत्यादी ) सेवनामुळे अनेक प्रकारच्या मोहाला बळी पडतो. त्यानंतर मानसिक आजाराला सूरुवात होऊन शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पुरता माणूस खचून जाऊन एक दिवस अकालीच भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून घेतो. म्हणून आजच्या घडीला माणसाचे वय जास्तीत जास्त वयोमान 60 वर्षापर्यंतच टिकाऊ/ टाकाऊ झाले आहे.

              त्यातुलनेत अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रांस , चीन इत्यादी प्रगत राष्ट्रातील नागरिकांचे वयोमान आणि आरोग्य हे आपल्यापेक्षा निश्चितच 10/ 15 वर्षांनी मोठे आहे. हा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. शिवाय आपल्या भारतापेक्षा त्या देशात विदेशी दारूच्या सेवनाचे प्रमाण कदाचित जास्तही असू शकतं. परंतू ते आहारी जात नाहीत. ते खाण्यापिण्यासाठी जगत नसून, जगण्यासाठी खाणे पिणे करतात. त्यामुळे ते डोळस असतात. वयक्तिक आणि सामुदाईक जीवनात ते कर्तव्याने जगतात. हा त्यांच्यातील आणि आपल्यातील सर्वसामान्य जनतेतील जीवन जगण्याचा मुलभूत फरक आहे.

            आपला येथील सर्व सामान्य माणूस मात्र खाण्यापिण्यासाठीच जगणे. हे ध्येय उराशी बाळगल्यामुळे शारीरिक व बौद्धिक कष्ट जे घेतो ते केवळ शारीरिक आणि मानसिक क्षणभन्गुर सुखाच्या लालसेपोटी.

        म्हणून आम्ही वयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात कर्तव्यातून सिद्ध न होता केवळ वरीलप्रकारच्या लालसेपोटी निर्माण झालेल्या शारीरिक आणि मानसिक दुःख यांना आम्ही आमच्या कर्माचे भोग समजून आला दिवस कंठीत जातो आणि एकदिवस संपून जातो. म्हणून आमचे वयोमान इतरांच्या तुलनेत कमी आहे.!

    अगदी याचप्रकारे आमच्या जीवनाप्रमाणेच आमच्या……

 लोकशाही आणि संविधान…

   यांच्या बाबतीत सुद्धा झाले आहे…..!

                जेंव्हा आम्हाला आमचे सार्वजनिक जीवन धार्मिक कर्मकांडात ( आजकाल सर्वच धर्मात कर्मकांड चालू आहे, केवळ स्वरूप वेगवेगळे आहेत एवढेच ) अडकल्यामुळे आम्ही वैज्ञानिकदृष्ट्या डोळस बनून सदविचारी बनू शकलो नाही हे वास्तव आम्ही आजपर्यंत गेल्या 70 वर्षात स्वीकारू शकलो नाही हेच वास्तव आहे.

              त्यामुळे येथील राज्यकर्त्यांना आमची ही नस सापडल्यामुळे आम्ही कितीही पदव्या घेऊन सुशिक्षितांचा आव आणत असलो तरी चिखलाचे पाय राजकारण्यांच्या कूटनितीपुढे आपोआप गळून पडतात.

            त्यामुळे येथील व्यवस्थेने ( केंद्र व राज्य सरकारांनी) आमच्यावर कितीही जाचक कर लावून, कितीही कर्जबाजारी करून आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेले तरी आम्ही हुं की चू करणार नाही. कधीही रस्त्यावर या विरोधात रस्त्यावर उतरणार नाही, ही सत्य परिस्थिती आहे.

             आणि दुसरे विशेष सांगावयाचे म्हणजे हे की आमच्या सार्वजनिक आंदोलनाला, किंवा चळवलीला राजकीय वास असल्याशिवाय यश येत नाही. हा एक गैरसमज आमच्यात झाल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्काचा अर्थच आम्हाला खऱ्या अर्थाने आम्हाला समजला नाही. म्हणून आमच्यातील हा न्यूनगंड जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही या देशाचे नागरिक आहोत हे सिद्ध होत नाही………!

             ताजे उदाहरण घ्या, की आम्हाला ( बुद्धीजीवी वर्गाला) समजते, की लोकशाही व संविधान यामुळेच आम्ही आमच्या पुढच्या भावी पिढीचे भवितव्य उज्वल होऊ शकते. या संविधानातील मूलभूत अधिकारामुळेच आम्ही लोकशाही आणि संविधान यांना जिवंत ठेऊ शकतो. हे ठाऊक असतांना या मूलभूत हक्कातील सर्वोच्च स्थानी असलेल्या मताच्या अधिकाराच्या बाबतीत आम्ही जागरूक होऊ शकत नाही. ही एक शोकांतिका आहे. हा मताचा अधिकार म्हणजे आमच्या ( सर्वसामान्य जनतेच्या ) प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शारीरिक आणि मानसिक कृत्रिम आजाराचे RAW MATERIAL आहे…..!

              आणि हा आमच्या मताचा अधिकार गेल्या 20 वर्षांपासून या व्यवस्थेकडून हिरावून घेण्यात आला आहे. हा मताचा अधिकार किती महत्वाचा आहे जाणूनच घ्यायचे असेल आणि तेही एकाच वाक्यात तर असे सांगता येईल की,……..

     जनतेने, सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी या EVM विरोधात टोकाचे आंदोलन करून सुद्धा कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ, न्यायमंडळ आणि गोदीमीडियाने, त्याचबरोबर मुख्य निवणूक आयोगाने EVM + VVPAT न हटविण्यासाठीच टोकाची भूमिका घेतली……..!

          या वाक्यातच सर्वकांही समावलेलं आहे……!

        म्हणून येत्या पुढील काळात, विशेषतः 2029 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत या EVM ला आपल्याला हटवील्याशिवाय स्वस्थ बसता येणार नाही….. 

       जागृतीचा लेखक

         अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689