सावली (सुधाकर दुधे)
गावातील बालकांवर होणाऱ्या अत्याचारविरोधी निर्णय घेण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रत्येक गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करने अनिवार्य आहे.रूदय सामाजिक संस्था व कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊडेशन द्वारा संचालित अक्सेस टु जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्पांतर्गत चार गाव येथे आयोजित ग्रामसभेत ग्राम बाल संरक्षण समिती गठीत करण्यात आली.
गावातील बालकांवर भविष्यात कुठल्याही प्रकारचे अत्याचार होवू नये. त्यांच्या सर्वांगीण विकासात भर पडावी. यासाठी ही समिती गठीत करण्यात आल्याचे मत रूदय सामाजिक संस्थेचे क्षेत्र अधिकारी सोनल रामटेके यांनी मांडले.तर ग्रा. प.चारगाव चे ग्रामसेवक सौ. चंद्रप्रभा वाघ मॅडम यांनी ग्राम बाल संरक्षण समिती निवडीचे स्वरूप सांगून बालविवाहाचे वाढते प्रमाण व कारणे सांगितले त्यानंतर उपस्थीत नागरिकांकडून बालविवाहाविरूद्ध शपथ वदवून घेतली यावेळी चारगावचे प्रथम नागरिक सरपंच सौ ज्योती बहिरवार, ग्रामसेवक वाघ मॅडम, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील , अंगणवाडी सेविका, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, गावातील नागरीक उपस्थित होते.