सुधाकर दुधे
सावली प्रतिनिधी
रुदय सामाजिक संस्था आणि कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन द्वारा संचालित एक्सेस टु जस्टिस फॉर चिल्ड्रन्स प्रकल्प चंद्रपूर मुल तालुक्यांतील कर्मविर महाविद्यालय मुल येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी बाल विवाह न करण्याची शपथ घेतली.
तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अन्वये मुलीचे लग्नाचे वय 18 वर्ष मुलाचे 21 वर्ष पूर्ण असून याची आम्हाला जाणीव आहे,वय पूर्ण झाल्याशिवाय आम्ही विवाह करणार नाही.आम्ही आमच्या गावात आणि आमच्या कुटुंबात बालविवाह होवू देणार नाही.तसेच बाल विवाहाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही.या विषयी सामूहिक रित्या 300 विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
रुदय सामजिक संस्थेचे क्षेत्र अधिकारी सोनल रामटेके यांनी कर्मवीर महाविद्यालय मुल येथे शिकत असलेल्या 300 विद्यार्थ्यांनी बालविवाह करनार नसल्याची शपथ देवून बालविवाहाचे दुष्परिणाम समजावुन सांगितले.
बालविवाहामुळे मुलींना मिळणारे हक्क नाकारले जातात. त्यांना लहान वयात घरकाम शिकण्याची सक्ती केली जाते.ते शिक्षणापासून वंचित राहतात, आई होण्यासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या निरोगी असन महत्वाचं आहे,मुलींच्या लवकर लग्नामुळे त्या लवकर आई होतात ज्यामुळे आई व मुलाचे आरोग्य धोक्यात येते.अल्प वयीन मुलीचा प्रसूती दरम्यान मृत्यु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विवाह करणाऱ्या मुलासाठी 21 वर्ष पूर्ण तर मुलींसाठी 18 वर्ष पूर्ण ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.कायद्याचे उल्लांगण करणाऱ्या व्यक्तींनाही शिक्षा केली जाते याविषयी मार्गदर्शन क्षेत्र कार्यकर्ता सोनल रामटेके यांनी केले.
बालविवाहा बद्दल जागरूकता वाढवण्याचा आणि प्रथा बंद करण्याच्या प्रयत्नाचा परिणाम म्हणून अलीकडच्या काळात त्यात लक्षणीय घट झाली आहे भविष्यात हे पूर्णपणे नष्ट होईल असे मत शाळेच्या मुख्याध्यापक डॉक्टर वनिता वाळके यानी व्यक्त केले.
यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होतें.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर अलूरवार यांनी केले,तर आभार आर.जी. बोधे यांनी मानले.