उमेश कांबळे ता प्र भद्रावती :
भद्रावती तालुक्यातील तथा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या मौजा कचराळा गाव परिसरात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला असून ग्रामस्थ या वाघाच्या दहशतीत आहे. वन विभागाने लागलीच वाघाचा बंदोबस्त करावा अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत कचराळाच्या वतीने वनविभागाला देण्यात आले आहे.
कचराळा हे गाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प लगतच्या जंगल शेजारी असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या जागेवर काटेरी व झुडपी जंगल निर्माण झाले आहे. या परिसरात पाच ते सहा पट्टेदार वाघाचा वावर असल्याचे निवेदनात नमूद असून सदर बाब शेतकरी, गुराखी व नव्याने वसलेल्या एसएमएस कंपनीच्या कामगारांच्या व मजुरांना दररोज दिसत असल्याचे म्हटले आहे.
बीबीकाही दिवसांपूर्वी कचराळा येथील पाळीव प्राण्यांना देखील वाघांनी भक्ष केले असल्यामुळे पुढे मानवी जीवित हानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. गावकऱ्यांना शेतात जाणे-येणे करणे भीतीचे व कठीण झाले आहे. या परिसरातील ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत असून त्वरित या वाघाचा बंदोबस्त करावा अशा निवेदन सरपंच भाग्यश्री येरगुडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी. शेंडे यांना दिले.
याप्रसंगी गावातील उप सरपंच छत्रपती एकरे, सदस्य जगन्नाथ पायताडे, सचिन माऊलीकर, सुनीता चुदरी, पुष्पा येरगुडे, सीमा कुलमेथे, वन समितीअध्यक्ष राकेश येरगुडे, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यभान येरगुडे, सामाजिक कार्यकर्ता संदीप निखाडे, भय्याजी बोबडे, यादव भगत, तुळशीदास ठुनेकर, बाबा येरगुडे, नागो चुदरी, दत्तू सोमलकर, विठ्ठल आवारी, सुमित्रा सोमलकर, सुमित्रा धोबे, अंजनाबाई बोबडे, अंजनाबाई कोडापे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.