ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली :येथील प्रसिद्ध हॉटेल स्टॉप इन चे मालक गिरीश रहांगडाले यांची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट 500 ही गाडी दिनांक एक सप्टेंबर 2022 च्या मध्यरात्री जवळपास एक ते दोन च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हॉटेल समोरून चोरीला नेलेली होती अज्ञात चोरट्यांनी चोरी करताना लक्षात येऊ नये म्हणून हॉटेल समोर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांना दुसऱ्या साधनांनी झाकून ठेवलेले होते. आज दिनांक 2 सप्टेंबरला सकाळी हॉटेलमधील कर्मचारी उठल्यावर ही चोरीची घटना लक्षात आली. लगेच गिरीश रडांगडाले यांनी पोलीस स्टेशनला धाव घेऊन गाडी चोरीच्या रिपोर्टची नोंद केली. साकोली पोलीस स्टेशन तर्फे या चोरीची लगेच दखल घेऊन चारी बाजूला नाकाबंदी करून आपल्या गुप्तचरांना सक्रिय करण्यात आले त्यामुळे अज्ञात चोरट्यांना खूप दूर पळून जाणे शक्य झाले नाही तसेच त्यांनी गाडीची वायरिंग तोडून गाडी डायरेक्ट सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही व त्यांच्या गाडी चोरीचा डाव फसला. अज्ञात चोरट्यांना वाटले की आता आपण पोलिसांच्या तावडीत सापडू त्यामुळे त्यांनी त्या गाडीला साकोली येथील एरीकेशन कॉलनी च्या मागील जंगलामध्ये फेकून दिली. त्या एरियामध्ये शेळ्या राखणारे महादेव नागपुरे यांना आज सायंकाळी चार वाजता दरम्यान शेळ्या राखत असताना झाडांच्या आत मध्ये गाडी सारखी वस्तू फेकलेली दिसली त्यांनी लगेच तिथे जाऊन पाहिले असता त्यांना तिथे रॉयल इन्फिल्ड बुलेट पडलेली दिसली त्यांनी लगेच याची कल्पना पोलीस स्टेशन दिली. गाडीची माहिती मिळताच लगेच साकोली पोलीस स्टेशनचे पीएसआय खोब्रागडे , अमितेश वडट्टेवार व त्यांची टीम मोका चौकशी करिता जागेवर पोहोचली व पंचनामा करून गाडी आपल्या ताब्यात घेतली. अज्ञात चोरांचा सुगावा लागलेला असून शोध घेणे सुरू आहे लवकरच चोरांना पकडण्यात येईल असे सांगितले. साकोली पोलीस विभागाच्या तत्परतेमुळे 24 तासाच्या आत चोरीला गेलेली गाडी परत मिळालेली आहे. त्यामुळे साकोली येथील नागरिकांतर्फे साकोली पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले व अशीच तत्परता नेहमी दाखवावी ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे