प्रेम गावंडे 

उपसंपादक

दखल न्युज भारत

     

           ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने तथागत गौतम बुद्ध यांच्या विश्व शांती चा संदेश घेऊन आंतरराष्ट्रीय अष्टधातु पासून निर्मित बुद्ध प्रतिमांचे भव्य वितरण आणि सम्मान सोहळयाचे आयोजन गगन मलिक फाऊंडेशन जिल्हा चंद्रपूर यांच्या तर्फे दिनांक १४ सप्टेंबर २०२२ ला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात येत आहे. परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक चंद्रपूर भुमीत आदरणीय भिक्खु तिज बिन ताम, सिने अभिनेते गगन मलिक आणि व्हिएतनाम भिक्खू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिएतनाम देशातून प्राप्त झालेल्या अष्टधातूंच्या बुद्ध प्रतिमांचे भव्य वितरण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या मान्यवरांना बुध्द प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विनयबोधी डोंगरे, जयदेव खांडे, सुरज गावंडे, प्रियवंद वाघमारे, बि डी देशपांडे, अनुताई दहेगावकर, ईजि. संजय वासनीक, प्रा.स्निग्धा सदाफळे, विकास तायडे, अमित वाघमारे, बाळुभाऊ रामटेके, मानव वाघमारे, निखील कडुकर, विशाल हजबन, सम्राट नागमोर्य, अभिजीत रेवतकर, साहिल गानफाडे, शिवानी रामटेके आणि श्रवन परचाके करत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com