चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा (लाखनी) :-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आज दि. 30 ऑगस्ट रोजी लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस तालुकाध्यक्ष राजूभाऊ निर्वाण यांच्या नेतृत्वात लाखनी तहसिलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे समस्या तातडीने सोडविण्यात यावे अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आले आहे.
निवेदनात जिल्ह्यात व तालुक्यात जुलै,ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली व धान, सोयाबीन, कापूस आदिचे उत्पादन बुडाले, दुबार पेरणी, रोवणी करून सुद्धा वारंवार झालेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले असून अशा शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत तात्काळ देण्यात यावी, जिल्ह्यात तसेच तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरे पडली असून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत, त्यांना तात्काळ शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, केंद्र सरकारच्या अडवनुकीच्या धोरणामुळे अनेक धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान बाहेर कमी भावात विकावे लागले तसेच धान केंद्रावर विकून सुद्धा दोन महिन्यापासून पेमेंट जमा झाले नाही, पत्र निघूनसुद्धा अजूनपर्यंत केंद्र सुरू झाले नाही, तात्काळ केंद्र सुरू करून मोजलेल्या धानाचा तात्काळ मोबदला देण्यात यावा तसेच अनियमितता करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात यावी आदि मागण्यांचा समावेश असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास जिल्ह्यात व तालुक्यात जनआंदोलन करण्याचा इशारा लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आला.
याप्रसंगी मा. जिल्हा उपाध्यक्ष शफीभाई लद्धानी,मा. शहर अध्यक्ष दिनेश गिर्हेपुंजे, मा.डॉ. विकास गभने, सौ. स्वातीताई वाघाये सभापती महिला व बालकल्याण जि. प.भंडारा,सौ. मनिषाताई निंबार्ते सदस्या जि. प.भंडारा,सौ.विद्याताई कुंभरे सदस्या जि. प.भंडारा,सौ.प्रणालीताई सार्वे सभापती पं. स. लाखनी,सुनिल बांते सदस्य पं.स. लाखनी, विकास वासनिक सदस्य पं. स. लाखनी,जयकृष्ण फेंडारकर,भोला उईके, प्रिया खंडारे,सुनंदा धनजोडे, सुनिता गौरे, संध्या धांडे,मोहन निर्वाण,विजय सार्वे,विपुल कांबळे, प्रदीप तीतिरमारे,हेमंत बांडेबूच्चे,आदिनाथ चारमोडे, विक्रम लांजेवार,धनराज बारस्कर, श्याम बेंदवार, ज्ञानेश्वर राहांगडाले, संजय रहांगडाले, चरणदास बारस्कर, दुर्गेश चोले,सुनील पाखमोडे, विजय वाघाये, ओमप्रकाश तरोणे, मोतीराम राऊत,अनिकेत गोस्वामी, रूपचंद सोनवणे,हेमंत बडवाईक, जावेद लद्धानी,मुस्ताक छव्वारे, यशवंत खेडीकर,सचिन बागडे, रितेश कांबळे,अनमोल लोणारे, विजय पाखमोडे,गणेश बोधनकर,अनिल बावनकुळे, नंदलाल चौधरी,महेश निर्वाण, लोकेश गायधनी,कुंदन आगाशे, सुहास ढेंगे,नेहाल कांबळे नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.