संपादकीय

   प्रदीप रामटेके 

    

        भारतीय संविधान म्हणजे या देशातील तमाम नागरिकांचे महा सुरक्षा कवच आहे व त्यांच्या अधिकार हक्कांचे कायदेशीर न्यायालय आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कणखर तथा मजबूत पायवा आहे!..

        मात्र,देशातील बहुसंख्य नागरिकांना समजून येत नसले तरी किंवा समजून घेता येत नसले तरी भारतीय संविधानाच्या विरोधात जाऊन काम-कार्य-कृती करणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने या देशातील नागरिकांच्या सर्व प्रकारच्या उन्नतीवर,शैक्षणिक प्रगल्भतेवर,राजकीय क्षमतेवर,सामाजिक दायित्वावर,प्रशासकीय यंत्रणेच्या मजबूतीकरणावर,आर्थीक क्षेत्रातंर्गत सहभागावर आणि न्यायसंगतेवर,गंभीर परिणाम पडत असल्याचे दिसून येत आहे.

          यामुळेच भारतीय संविधानाच्या विरोधात काम-कार्य-कृती करणाऱ्यांचे आता करायचे तरी काय?हा आव्हानात्मक प्रश्र्न देशातील नागरिकांना गंभीरपणे सतावू लागला आहे व त्यांना चिंताग्रस्त होण्यासाठी कारणीभूत ठरु लागला आहे.

        केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध म्हणून या देशातील सर्व समाज घटकातील बहुसंख्य लोक भारतीय संविधानाचे पाने उघडून बघत नसल्याचे त्यांच्या बौद्धिक कार्यपद्धती वरुन लक्षात येते आहे.

      परंतू,”भारतीय संविधान,”हेच,तमाम भारतीय नागरिकांचे मजबूत असे संरक्षक – रक्षक आहे व सर्व प्रकारच्या उन्नतीचे स्त्रोत आहे हे भारतीय नागरिकांच्या लक्षात यायला उशीर झाला तर ते स्वत:च स्वत:चे अधिकार – हक्क आणि स्वत:चे अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावून बसावेत अशी वेळ त्यांनी स्वत:वर येऊ देऊ नये,असेच देशातील राजकीय कार्यपध्दतीचे वातावरण भिज्ञपणे सांगू लागले आहे.

         वैचारिक आकलनाविना राजकीय पक्षांच्या बेलगाम व बेताल वैचारिक गाभाऱ्यातंर्गत स्वत:ला इकडून तिकडे घुमवताना देशातील तरुण-तरुणी,मतदार,विद्यार्थी-विद्यार्थीनी,स्वत:च स्वत:चे भविष्य अंधकारमय करीत आहेत,हे त्यांना पुराव्यानिशी संघर्षमय व अवघड वैचारिक मंथनातून वेळ न दवडता सांगण्याची नितांत गरज आहे.

          राजकीय पक्षात व सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांना – कार्यकर्त्यांना स्व हिताबरोबर स्वत:च्या समाजाचे सर्वोत्तम हित,देशाच्या सार्वभौमत्वाचे सर्वोतोपरी हित,कुठल्या भुमिकान्वये कार्यात समाविष्ट आहे हे कळायलाच पाहिजे.

                केवळ लाभांच्या विचारातंर्गत राज्यकर्त्यांकडून व सामाजिक नेत्यांकडून कार्यपद्धती अन्वये भूमिका वठविल्या जात असतील तर समाज व देश लयास जान्याची संभावना नाकारता येत नाही.म्हणूनच समाज व देश सुरक्षित ठेवण्यासाठी आपण राजकीय,सामाजिक,आर्थिक,प्रशासकीय,शैक्षणिक,कायदेशीर आणि न्याय प्रक्रिया अन्वये कार्यपद्धती,जागरूक व सतर्कपणे नेहमी तपासल्या पाहिजेत आणि संबंधितांच्या कार्यपद्धती तपासणारे,”देशातील नागरिकांचे सर्वोच्च दायित्व आहे, हे त्यांनी ओळखले पाहिजे.. 

           तद्वतच आर्थिक विकास दराच्या बाबतीत देशातील नागरिकांना दररोज माहिती देण्यात आली पाहिजे व सदर माहिती कुठल्या क्षेत्रातंर्गत कशा पद्धतीची आहे हे सोप्या व सरळ भाषेत देशाच्या व राज्याच्या अर्थ विभागाने सांगायला पाहिजे.आर्थीक विकास दर म्हणजे नेमके काय? आणि आर्थिक विकास दर कशा पद्धतीचे असतात हे भारतीय नागरिकां कळायला पाहिजे.याचबरोबर या आर्थिक विकास दरान्वये देशातील नागरिकांना काय व कशा पद्धतीचा लाभ होतो हे नेहमी सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले पाहिजे.

          मात्र,विकास व उन्नती या दोन शब्दांची राजकीय परिभाषा देशातील नागरिकांना अजूनपर्यंत कळलेली नाही.विकास व उन्नती कुणाची करताय व कशासाठी करताय?हे उघड व स्पष्ट नाही. याचबरोबर विकास व उन्नती याचे गुपित असे राजकीय सुत्र बहुजन समाज घटकांच्या पथ्यावर नेहमी पडत असल्याने,त्यांची होणारी परवड,कुचंबणा,मुस्कटदाबी,अतिशय वेदनादायक आहे व त्यांचे नेहमी शोषण करणारे आहे,त्यांच्यावर सातत्याने अन्याय करणारे आहे हे नाकारून चालणार नाही.

         देशातंर्गत बहुजन समाजातील नागरिकांना राजकीय शब्दांच्या मायाजालान्वये व कायदेशीर प्रक्रियान्वये वर्षानुवर्षे गुरफटून ठेवण्याबाबत सुरू असलेली दिरंगाई कार्यप्रणाली अत्यंत घातक आहे व त्यांना त्यांच्या अधिकार हक्कांपासून वंचित ठेवणारी आहे.

           याचबरोबर महत्त्वाचे असे की भारतीय संविधानाच्या कक्षेत राहून जबाबदार कार्यवाहक या देशात कर्तव्य पार पाडत नसतील तर,”बहुजन समाज गुलाम बनणार नाही,यासाठी बहुजन समाज घटकातील नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी सतर्क होणे आवश्यक आहे.

       देशातील नागरिकांनी अज्ञानाच्या अहंकारातून व पक्षांच्या वैचारिक मत भिन्नतेतून बाहेर पडत,”भारतीय संविधान, वाचले पाहिजे व संविधानातंर्गत आपले अधिकार-हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजून घेतले पाहिजे.अन्यथा तुमचे मारक तुमीच ठराल?

       भितीदायक वातावरणातंर्गत चूप बसण्यापेक्षा,आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अविरत आणि निर्भिडपणे संघर्ष केला पाहिजे हे जगविख्यात प्रथम महाज्ञानी तथागत भगवान गौतम बुद्ध,महासम्राट राजा प्रियदर्शी अशोक,राजमाता जिजाऊ,रयतेचे न्यायीक राजे छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजीराजे,राजश्री छत्रपती शाहू महाराज,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले,राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,भगवान बिरसा मुंडा,अहिल्याबाई होळकर,जगविख्यात प्रकांड पंडित तथा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत तुकाराम महाराज,संत नामदेव महाराज,संत कबीरजी,संत घासिदासजी,संत रविदासजी,संत गाडगेबाबा,रामास्वामी पेरियार नायकर,आणि इतर संत महापुरुषांनी सांगितले आहेच!

        भारतीय संविधानाच्या चौकटी अन्वये न्यायनिवाडा होण्यासाठी व राजकीय नेतृत्वातंर्गत राज्यकर्त्यांकडून स्वहिताचे कर्तव्य पार पाडून घेण्यासाठी बहुजन समाजातील नागरिकांनी सातत्याने जागरूक राहिले पाहिजे आणि वेळप्रसंगी आपल्या हितासाठी-सुरक्षासाठी पक्षाच्या नेतृत्वाला नाकारणे शिकले पाहिजे.

        भारतीय नागरिक जो पर्यंत जात-धर्माच्या पुढे जाऊन,”मी प्रथम भारतीय आहे आणि मरेपर्यंत भारतीय आहे,या व्याक्याला व सामाजिक समानतेला महत्त्व देणार नाही तोपर्यंत भारताचे सार्वभौमत्व सुरक्षित आहे असे म्हणून चालणार नाही.यासाठीच भारतीय संविधान वाचले पाहिजे..

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com