ऋषी सहारे

संपादक

 

कोरची-एकीकडे देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले आहे आणि दुसरीकडे कोटगुल क्षेत्राची समस्या जैसे थे आहे देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला यामध्ये कोटगुल क्षेत्रात सुद्धा महोत्सव राबिविण्यात आला. परंतु या क्षेत्रातील ४५ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. २५ ऑगस्टला कोरची तहसीलदारामार्फत या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी निवेदन देऊन समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याला विनंती केली होती. परंतु समस्या सुटत नसल्याने निवेदनातून दिलेल्या ईशारा प्रमाणे गुरुवारी दुपारी मुरूमगाव येथील महावितरणात जिल्ह्यातून आलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना घेराव टाकून ढोलडोंगरी येथील मंजूर असलेले 33 केव्ही उपकेंद्र केव्हा उभारणार अशी विचारणा केली. यावेळी गडचिरोली महावितरण कार्यकारी अभियंता डोंगरवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर, धानोरा उपकार्यकारी अभियंता देशोपाल शेंडे, मुरुमगाव कनिष्ठ अभियंता चेतन लांडगे, कोरची तहसील आर आय प्रमोद धाइत, धानोरा नायब तहसीलदार, मुरुमगाव पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे उपस्थित होते.

            तसेच या क्षेत्रातील अनेक समस्या केव्हा सुटणार अशी सुद्धा वरिष्ठांना विचारणा केली त्यानंतर ढोलडोंगरी येथील मंजूर असलेली ३३ केव्ही वीज वितरण उपकेंद्राचे काम केव्हा सुरू करणार ते तारीख आम्हाला लिखित स्वरूपात द्यावे अशी यावेळी नागरिकांनी गडचिरोली कार्यकारी अभियंता डोंगरावर यांना केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की तत्कालीन सरकारने ढोलडोंगरी येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे काम मंजूर केले असून निधी पण आलेली आहे याचे टेंडर पण झालेले होते परंतु विद्यमान सरकारने या कामाचे आदेश न काढल्यामुळे अजून पर्यंत हे काम सुरू झालेले नसल्याचे सांगितले.

          परंतु आपणाला लिखित स्वरूपात देऊ शकत नाही आश्वासन देतो की १५ ते ३० दिवसाची वेळ द्या कामाला लवकरच सुरुवात करू असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले परंतु ते मान्य न करता अनेकदा निवेदने व चक्का जाम करून फक्त आश्वासनच देत आलेत त्यामुळे येथील नागरिकांनी यावेळी आंदोलनाचा पवित्रा हातात घेतला आहे. जेव्हा पर्यंत समस्या सुटणार नाहीये तेव्हा पर्यंत इथून जाणार नाही असे बोलून त्या ठिकाणी कोटगुल क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आंदोलन करण्यासाठी ठिया मांडून बसलेले आहेत तसेच शुक्रवारला छत्तीसगड ते महाराष्ट्र मार्गावर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचेही वरिष्ठांना सांगितले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com